केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी न्यूझीलंडचा पाच दिवसांचा दौरा पूर्ण केला असून, या दौऱ्यात भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार (एफटीए) विषयक चौथ्या फेरीच्या चर्चा ऑकलंड आणि रोटोरुआ येथे पार पडल्या. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या माहितीनुसार, दोन्ही देशांदरम्यान पाच दिवस फलदायी चर्चा झाली. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि त्यांच्या समकक्ष टॉड मॅकक्ले यांनी चर्चेतील प्रगतीचे स्वागत केले आणि आधुनिक, सर्वसमावेशक तसेच भविष्योन्मुख एफटीए करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
चर्चेतील प्रमुख विषय: दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी वस्तू व सेवा व्यापार, आर्थिक व औद्योगिक सहकार्य आणि उत्पत्तीचे नियम (Rules of Origin) यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर सविस्तर चर्चा केली. तसेच, समावेशक आणि शाश्वत विकास (Inclusive and Sustainable Development) प्रोत्साहन देत आर्थिक संबंध दृढ करण्याची आणि दोन्ही देशांसाठी परस्पर लाभदायी भागीदारी निर्माण करण्याची इच्छा व्यक्त केली.
हेही वाचा..
वक्फ कायद्याच्या नावाखाली दिशाभूल करणे थांबवा
प्रामाणिकपणा, देशभक्तीच्या मूल्यांवर ठाम राहण्याची प्रेरणा आडवाणींनी दिली
मिरचीची पूड फेकणाऱ्या चोरट्या महिलेला सोनाराने १७ थपडा मारल्या
भारताची भूमिका: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक समृद्धी व सुरक्षित पुरवठा साखळी (Supply Chain) मजबूत करण्यासाठी महत्त्वाच्या आर्थिक भागीदाऱ्या निर्माण करण्यास कटिबद्ध आहे. द्विपक्षीय व्यापाराचे आकडे: अधिकृत आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील द्विपक्षीय व्यापार १.३ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतका होता, जो मागील वर्षाच्या तुलनेत ४९ टक्क्यांची वाढ दर्शवतो. प्रस्तावित मुक्त व्यापार करारामुळे शेती, अन्न प्रक्रिया, अक्षय ऊर्जा, औषधनिर्मिती, शिक्षण आणि सेवा क्षेत्रांत नवीन संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या कराराचा लाभ उद्योग क्षेत्राबरोबरच ग्राहकांनाही होईल.
एफटीएचे संभाव्य फायदे: या करारामुळे व्यापार प्रवाह वाढेल, परस्पर गुंतवणूक मजबूत होईल, पुरवठा साखळी अधिक सक्षम बनेल आणि व्यवसायांना स्थैर्य व विस्तारित बाजारपेठेचा प्रवेश मिळेल. पुढील दिशा: दोन्ही देशांनी “इंटर-सेशनल वर्क”द्वारे सर्व विषयांवर सखोल चर्चा सुरू ठेवण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड हे मुक्त व्यापार करारावर लवकरच अंतिम सहमतीच्या दिशेने वाटचाल करतील.







