25 C
Mumbai
Friday, February 27, 2026
घरबिजनेसपाकिस्तान सीमेवर पुन्हा गरजणार भारतीय हवाईदल

पाकिस्तान सीमेवर पुन्हा गरजणार भारतीय हवाईदल

Google News Follow

Related

पाकिस्तान सीमेच्या जवळ भारतीय हवाईदलाचे फायटर जेट पुन्हा एकदा आकाशात गर्जना करताना दिसणार आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या धर्तीवर २७ फेब्रुवारी रोजी राजस्थानातील जैसलमेर येथे या वर्षातील पहिला आणि सर्वात मोठा हवाई लष्करी सराव आयोजित करण्यात येणार आहे. या सरावाला ‘वायु शक्ति २०२६’ असे नाव देण्यात आले आहे.

संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सरावात हवाईदलाच्या वेस्टर्न आणि साउथ वेस्टर्न कमांडमधील एअरबेस आणि त्यांची सर्व साधनसामग्री सहभागी होणार आहे. १०० हून अधिक विमानं आणि विविध युनिट्स या सरावात भाग घेणार असून सर्व युनिट्सना पूर्णपणे सक्रिय करण्यात आले आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पराक्रम गाजवलेल्या जवळपास सर्व लढाऊ विमानांचा आणि एअर डिफेन्स सिस्टीमचा या सरावात समावेश असेल. राफेल, सुखोई-३०, तेजस, मिग-२९, जग्वार, मिराज-२००० आणि हॉक ही विमाने अचूक लक्ष्यभेद करताना दिसतील. मिग-२१ ही विमाने निवृत्त झाल्यामुळे यावेळी प्रथमच ती या सरावात सहभागी नसतील. याशिवाय ‘प्रचंड’ अटॅक हेलिकॉप्टरकडून रॉकेट फायरिंगचे प्रदर्शनही होणार आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा सराव काल्पनिक युद्धपरिस्थिती निर्माण करून केला जाणार आहे. संपूर्ण कारवाईवर हवाईदलाच्या इंटीग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टम (IACCS) द्वारे लक्ष ठेवले जाईल. ऑपरेशन सिंदूरदरम्यानही याच प्रणालीने पाकिस्तानच्या जेट्स, क्षेपणास्त्रं आणि ड्रोनवर बारकाईने नजर ठेवली होती.

थलसेनेची ‘आकाश तीर’ प्रणाली देखील IACCS शी जोडलेली आहे. हाय-पॉवर, लाँग-रेंज, मिडियम-रेंज आणि शॉर्ट-रेंज रडारमधून मिळणाऱ्या माहितीद्वारे संपूर्ण एअर पिक्चर तयार केली जाते आणि त्यानुसार प्रत्येक हवाई धोक्याला प्रतिसाद दिला जातो.

या सरावात फायटर जेट्ससोबतच फिक्स्ड-विंग ट्रान्सपोर्ट विमानं सी-130J आणि सी-295, तसेच प्रचंड, चिनूक, एमआय-१७ आणि एएलएच हेलिकॉप्टर सहभागी होणार आहेत. ड्रोन आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेले लॉयटरिंग म्युनिशनचाही वापर केला जाईल. विशेष म्हणजे, सी-295 प्रथमच ‘नाईट असॉल्ट लँडिंग ड्रिल’ पार पाडणार आहे. तर सी-130J सुपर हरक्युलिस छोट्या धावपट्टीवर लँड करून गरुड कमांडोंना युद्धक्षेत्रात उतरवेल आणि अल्पावधीत पुन्हा उड्डाण करेल. या संपूर्ण कारवाईदरम्यान दोन अटॅक हेलिकॉप्टर सुरक्षा कवच देणार आहेत.

या सरावाबाबत पाकिस्तानलाही माहिती देण्यात आली असून त्यासाठी NOTAM जारी करण्यात आला आहे. मात्र संभाव्य परिस्थिती लक्षात घेता भारतीय हवाईदलाने आपली एअर डिफेन्स प्रणाली पूर्णपणे सज्ज ठेवली आहे. IACCS हल्ला आणि संरक्षण या दोन्ही बाबींमध्ये संपूर्ण हवाई क्षेत्रावर लक्ष ठेवणार आहे.

एअर डिफेन्ससाठी बहुपदरी व्यवस्था उभी करण्यात आली असून त्यात अँटी-एअरक्राफ्ट गन, अँटी-ड्रोन प्रणाली आणि ऑपरेशनल रेडीनेस प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. ‘आकाश’ क्षेपणास्त्र प्रणाली आणि थलसेनेची एल-७० तोफदेखील तैनात राहणार आहे.

या भव्य ‘वायु शक्ति २०२६’ सरावासाठी अनेक व्हीव्हीआयपींना निमंत्रित करण्यात आले असून दिल्लीतील मित्रदेशांच्या दूतावासांमधील सुमारे ४० अधिकारीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
296,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा