भारतातील व्यावसायिक वाहन (कमर्शियल व्हेईकल) आणि प्रवासी वाहन (पॅसेंजर व्हेईकल) विभागासाठी आर्थिक वर्ष २६ साठीचा आउटलुक आशादायी असल्याचे दिसून आले आहे. जीएसटी दरात कपात होण्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही विभागांत मध्यम स्वरूपाची वाढ अपेक्षित आहे. ही माहिती रविवारी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात देण्यात आली. रेटिंग एजन्सी आयसीआरएच्या अहवालानुसार, ऑगस्ट महिन्यात व्यावसायिक वाहनांच्या घाऊक विक्रीत वार्षिक आधारावर ६ टक्क्यांनी वाढ झाली, तर किरकोळ विक्रीत ३.२ टक्क्यांची वाढ झाली.
या मर्यादित वाढीचे कारण म्हणजे जीएसटी कपातीची अपेक्षा ठेवून फ्लीट ऑपरेटर्सनी खरेदी पुढे ढकलली. परिणामी आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या पाच महिन्यांत घाऊक विक्रीत फक्त १.३ टक्क्यांची किरकोळ वाढ झाली. आयसीआरएने नवीन मॉडेल्सच्या लाँचिंगमुळे आणि धोरणात्मक सवलतीमुळे आर्थिक वर्ष २६ मध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत १ ते ४ टक्क्यांनी वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. हलके व्यावसायिक वाहनांच्या (LCV) किरकोळ विक्रीत ऑगस्ट महिन्यात ८.२ टक्के आणि क्रमिक पातळीवर ०.८ टक्क्यांनी वाढ झाली.
हेही वाचा..
भारतीय कुटुंबांची संपत्ती सर्वाधिक वेगाने वाढली
सनातनमुळे भारताची ओळख, धमक्या देणे थांबवा
मुंबईत कैद्याने तुरुंग अधिकाऱ्यावर केला हल्ला
भारताच्या विजयासाठी उज्जैनमध्ये विशेष हवन
अहवालात म्हटले आहे की या वाढीनंतरही, सेकंड हँड वाहनांची वाढती पसंती आणि इलेक्ट्रिक त्रिचक्री वाहनांच्या स्पर्धेमुळे LCV ट्रक विभागात आव्हाने कायम आहेत. अलीकडील लांबलेल्या पावसामुळे मागणीत झालेल्या घटीनंतरही मध्यम आणि जड व्यावसायिक वाहनांच्या (M&HCV) विक्रीत वार्षिक आधारावर ९.२ टक्क्यांची दमदार वाढ झाली. बस विभागात रिप्लेसमेंट डिमांडमुळे ८ ते १० टक्क्यांच्या वाढीचा अंदाज आहे.
अहवालानुसार, ऑगस्ट महिन्यात प्रवासी वाहनांची विक्री मागील महिन्याच्या तुलनेत आणि मागील वर्षाच्या त्याच कालावधीच्या तुलनेत कमी राहिली, कारण खरेदीदारांनी जीएसटी कपात होण्याच्या शक्यतेमुळे खरेदी पुढे ढकलली. प्रवासी वाहनांच्या निर्यातीत ऑगस्ट महिन्यात २५ टक्के आणि आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत १५ टक्क्यांची वाढ झाली. एसयूव्हीने आपले वर्चस्व कायम ठेवले असून, एकूण प्रवासी वाहन विक्रीतील त्यांचा वाटा ६५ ते ६६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. आयसीआरएने म्हटले आहे की एकूण आर्थिक वातावरण, बांधकाम आणि खाणकाम क्षेत्रातील पुनरुत्थान आणि सणासुदीच्या काळातील सातत्यपूर्ण मागणी यामुळे ऑटोमोबाईल विभागातील विक्रीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.







