26 C
Mumbai
Friday, March 20, 2026
घरबिजनेसभारताचा सेमीकंडक्टर बाजार २०३५ पर्यंत ३०० अब्ज डॉलरचा टप्पा गाठणार

भारताचा सेमीकंडक्टर बाजार २०३५ पर्यंत ३०० अब्ज डॉलरचा टप्पा गाठणार

AI, ऑटोमोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील वाढती मागणी

Google News Follow

Related

भारताचा सेमीकंडक्टर (चिप) उद्योग पुढील काही वर्षांत प्रचंड वेगाने वाढणार असल्याचे एका ताज्या अहवालातून समोर आले आहे. सध्या देशातील सेमीकंडक्टर बाजाराचा आकार अंदाजे ४५ ते ५० अब्ज डॉलरच्या आसपास आहे आणि गेल्या तीन वर्षांत तो सुमारे २० टक्के दराने वाढत आहे. ही वाढ पुढील दशकात आणखी वेग घेणार असून भारत जागतिक चिप उद्योगात मोठा खेळाडू बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अहवालानुसार, भारताचा सेमीकंडक्टर बाजार २०३० पर्यंत जवळपास तिपटीने वाढून १२० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतरही ही वाढ कायम राहून २०३५ पर्यंत हा बाजार तब्बल ३०० अब्ज डॉलरपर्यंत जाऊ शकतो. या वाढीमागे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), ऑटोमोबाइल उद्योग, डेटा सेंटर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या क्षेत्रांतील वाढती मागणी हे मुख्य घटक आहेत.
हे ही वाचा: 

गुरुत्वाकर्षणाला आव्हान देणारी लेहमधील ‘मॅग्नेटिक हिल’!

गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गूळ का खातात?

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे महत्त्व काय?

सरकारचा मोठा डिजिटल स्ट्राईक

भारत सध्या मोठ्या प्रमाणावर सेमीकंडक्टर आयात करतो, पण आगामी काळात ही परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. २०३५ पर्यंत देशांतर्गत उत्पादन इतके वाढेल की भारत स्वतःच्या गरजांपैकी ६० टक्क्यांहून अधिक चिप्स देशातच तयार करू शकतो. यामुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि देशाचा तंत्रज्ञान क्षेत्रातील स्वावलंबन वाढेल.

सरकारच्या इंडिया सेमीकंडक्टर मिशनमुळे या क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे. आतापर्यंत १९ अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक मंजूर प्रकल्पांद्वारे आली आहे. यामध्ये OSAT युनिट्स, कंपाउंड फॅब आणि सेमीकंडक्टर फॅब यांचा समावेश आहे. याशिवाय, २०-२५ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीचे अनेक प्रकल्प विविध टप्प्यांमध्ये आहेत.

पुढील पाच वर्षांत या उद्योगात सुमारे ५० अब्ज डॉलरची अतिरिक्त गुंतवणूक होण्याचा अंदाज आहे. तसेच २०३० ते २०३५ दरम्यान आणखी ७५ ते ८० अब्ज डॉलरची गुंतवणूक होऊ शकते. या गुंतवणुकीमुळे संपूर्ण सेमीकंडक्टर इकोसिस्टम मजबूत होईल.

या क्षेत्राच्या वाढीमुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. अंदाजानुसार, २०३५ पर्यंत सुमारे २० लाख नोकऱ्या तयार होऊ शकतात. यामध्ये ३० टक्के नोकऱ्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, ३० टक्के डिझाइन सेवांमध्ये आणि उर्वरित ४० टक्के इतर संबंधित क्षेत्रांमध्ये असतील.

तथापि, या वेगवान वाढीसाठी योग्य धोरणांची अंमलबजावणी आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये समन्वय वाढवणे, पायाभूत सुविधा सुधारणा आणि दीर्घकालीन धोरणे तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य नियोजन केल्यास भारत जागतिक सेमीकंडक्टर उद्योगात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
299,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा