34 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरअर्थजगतझोमॅटोच्या आयपीओनंतर गुंतवणूकदारांना हा नवा पर्याय

झोमॅटोच्या आयपीओनंतर गुंतवणूकदारांना हा नवा पर्याय

Google News Follow

Related

शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी आयपीओ हा एक पर्याय असतो. काही महिन्यांपूर्वी झोमॅटोचा आयपीओ आला होता. आता आणखी एक आयपीओ येत आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.

लवकरच स्विगीचा आयपीओ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्विगीचा आयपीओ आल्यास चांगल्या परताव्याची आशा आहे. सॉफ्टबँक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मसायोशी सन यांना असा विश्वास आहे. स्विगीची प्रतिस्पर्धी कंपनी झोमॅटोचा नुकताच आयपीओ काढण्यात आला होता, ज्याला गुंतवणुकदारांनी चांगला प्रतिसाद दिला.

अन्न पदार्थांची डिलीव्हरी करणाऱ्या स्विगीने पब्लिक ऑफर आणायचे ठरवले तर त्यांना चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असा विश्वास जगातील अनेक देशांमध्ये गुंतवणूक असलेल्या जपानस्थित सॉफ्टबँक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मसायोशी सन यांना वाटतोय.

हे ही वाचा:

तालिबानवर विश्वास ठेवता येणार नाही

रौप्य पदक जिंकूनही मोदींची रवी दहियाकडे तक्रार का?

तालिबानने बामियानमध्ये आता ‘हा’ पुतळा उध्वस्त केला

तीन तिघाडा; अध्यक्षाची निवड म्हणून होईना

सॉफ्टबँकने अलीकडेच स्विगीसाठी १.२५ अब्ज डॉलर्सचा निधी उभारला. निधी उभारणीसाठी स्विगीचे मूल्य सुमारे ५ अब्ज डॉलरपेक्षाही जास्त लावण्यात आले होते. जर स्विगीचा आयपीओ  काढला गेला तर आपल्याला चांगल्या परताव्याची आशा असल्याचे सॉफ्टबँक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मसायोशी सन यांनी मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात म्हटले.

अन्न पदार्थांच्या डिलीव्हरीच्या क्षेत्रात स्विगीला टक्कर देणाऱ्या झोमॅटोचा नुकताच आयपीओ आला होता, ज्याला गुंतवणुकदारांनी चांगला प्रतिसाद दिला. कंपनीचे समभागही आयपीओच्या किंमतीपेक्षा जवळपास दुपटीवर व्यवसाय करत आहेत. झोमॅटोचा आयपीओ आल्यानंतर झोमॅटोचे बाजार भांडवल १३ अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाले आहे. यावर्षीच्या सुरुवातीला एका खासगी निधीसाठी झोमॅटोचे मूल्य सुमारे पाच अब्ज डॉलर्स होते.

दोन कोटीपेक्षा जास्त लोक दर महिन्याला स्विगीचे वापरकर्ते असल्याचे सॉफ्टबँक समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मसायोशी सन यांनी सांगितले. या जूनमध्ये प्रतिदिवशी जवळपास १५ लाख ऑर्डर मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. मागच्या एका वर्षात ही संख्या जवळपास अडीच पट वाढली आहे, तर महसूल २.८ पट वाढला असल्याचेही मसायोशी सन म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा