रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज, ४ मे रोजी पत्रकार परिषद घेत रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्याचे जाहीर केले आहे. रेपो दर वाढवल्यामुळे कर्जे महागणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसी मॉनिटरिंग समितीने रेपो दरात ४० बीपीएसने वाढ केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाचे पडसाद शेअर बाजारावरही दिसून आले. शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे.
महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरबीआयकडून व्याज दरात वाढ करण्यात आली. रेपो दरात ०.४० टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तर, कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये ०.५० टक्क्यांनी वाढवला आहे. रेपो रेट वाढवल्याने कर्ज महागणार आहेत. याचा परिणाम ग्राहकांवर होणार असून कर्जावरील व्याज दर वाढणार असल्याने ईएमआयमध्ये देखील वाढ होणार आहे.
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. सेन्सेक्स १००० अंकानी कोसळला. तर, निफ्टी ३३० अंकानी कोसळला. आज सकाळपासून शेअर बाजार अस्थिर होता. रिझर्व्ह बँकेने रेपो दराची घोषणा करताच शेअर बाजार कोसळला.
हे ही वाचा:
अजानचा आवाज घरातल्या मिक्सर इतकाच हवा
राणा दाम्पत्याला अटी- शर्तींसह जामीन मंजूर
नितेश राणेंच्या निशाण्यावर पुन्हा रझा अकादमी, पीएफआय
राज्यात अनेक ठिकाणी भोंग्याविना अजान
रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँक रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात.







