32 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
घरअर्थजगतहुश्श टेंशन गेलं ईएमआय वाढणार नाही.. रिझर्व्ह बँकेचा व्याज दरवाढीला ब्रेक

हुश्श टेंशन गेलं ईएमआय वाढणार नाही.. रिझर्व्ह बँकेचा व्याज दरवाढीला ब्रेक

रेपो दर सध्याच्या ६.५ टक्क्यांवर कायम

Google News Follow

Related

रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. सहावेळा व्याजदर वाढवल्यानंतर रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढीला ब्रेक लावला आहे. भारतीय रिझर्व्ह बँके च्या नाणेनिधी धोरण समितीची तीन दिवसीय बैठक गुरुवारी संपली. या बैठकीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी रेपो दरात कोणताही बदल केलेला करण्यात आलेला नसल्याचे जाहीर केले. रेपो दर सध्याच्या ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. सलग सहा वेळा वाढ केल्यानंतर आरबीआयने सातव्यांदा रेपो दरात वाढ न करून दिलासा दिला आहे.

रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी मे महिन्यापासून पासून व्याजदरात २५० बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. मात्र यावेळी दिलासा मिळाला आहे. म्हणजे तुमचे कर्ज जास्त महाग होणार नाही आणि तुमचा ईएमआय वाढणार नाही. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेताना तो ६.५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, अर्थव्यवस्थेत सुरू असलेली सुधारणा कायम ठेवत आम्ही सर्वसहमतीने धोरणात्मक दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काळाच्या गरजेनुसार पावले उचलली जातील, असेही ते म्हणाले.

रिझव्‍‌र्ह बँकेच्या या निर्णयामुळे महागड्या गृहकर्जाचा फटका बसलेल्या लोकांना दिलासा मिळाला आहे. रेपो दर न वाढवल्यानंतर आता बँका कर्जाच्या व्याजदरात वाढ करणार नाहीत. म्हणजे आता तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढणार नाही. ईएमआयमध्ये वाढ झाल्याने काही काळासाठी दिलासा मिळाला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की रेपो रेटमध्ये वाढ झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेला पूर्वीपेक्षा जास्त व्याज द्यावे लागत आहे. बँक जास्त व्याज आकारणार असेल तर ते तुमच्याकडूनच आकारणार हे उघड आहे. परिणामी बँकांना कर्जे महाग करावी लागतात. त्यामुळे गृह कर्ज, कार कर्जासह सर्व वैयक्तिक कर्ज महाग होते.

हे ही वाचा:

पाकिस्तानचा जीडीपी आणखी आटण्याची भीती

सर्वशक्तिमान, संगीतज्ञानमहंता हनुमान

मुंबईतील कोरोनाने ओलांडला २०० रुग्णांचा टप्पा

मारहाण प्रकरणातील महिला गर्भवती नसल्याचा नारायण राणेंचा दावा

रेपो रेट हा दर आहे ज्या दराने व्यावसायिक बँका रिझर्व्ह बँकेकडून कडून पैसे घेतात. गृह – वाहन यासह बहुतेक किरकोळ कर्जे या रेपो दरावर आधारित आहेत. यावेळी रेपो दरात वाढ न केल्याने बँकाही किरकोळ कर्जाच्या व्याजदरात वाढ करणार नाहीत, याचा थेट फायदा घर खरेदीदारांना होणार आहे. चलनवाढ कम्फर्ट झोनमध्ये असल्याने यावेळी रेपो दरात वाढ करण्यात आली नसल्याचे गव्हर्नर दास यांनी म्हटले आहे. मात्र, अमेरिकेची फेडरल बँक आणि ब्रिटनच्या मध्यवर्ती बँकेने एप्रिलमध्येही त्यांचे व्याजदर वाढवले ​​होते, त्यामुळे रिझर्व्ह बँकही रेपो दरात वाढ करेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण आत रिझर्व्ह बँकेने दिलासा दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा