31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरराजकारणभाजप लक्ष्मणासारखे लोकांचे प्रश्न सोडवतो

भाजप लक्ष्मणासारखे लोकांचे प्रश्न सोडवतो

भाजपच्या ४३ व्य स्थापना दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

Google News Follow

Related

लक्ष्मणणावर संकट आले तेव्हा हनुमानजींनी संपूर्ण पर्वत उचलून आणला . याच प्रेरणेतून भाजप देखील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे, यापुढेही करत राही. आज भारत समुद्रासारख्या प्रचंड आव्हाने पेलण्यास आणि त्यांना तोंड देण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक सक्षम आहे आसा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. आज देशभरात भारतीय जनता पक्षाचा ४३ वा स्थापना दिवस जोरदार साजरा केला जात आहे. या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील भाजप पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले, सागरासारख्या महा शक्तींचा मुकाबला करण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक सज्ज आहोत. हनुमानजी स्वतःसाठी काहीच तर दुसऱ्यांसाठीच सर्व काही करत होते. पण जेव्हा हनुमानजींना राक्षसांचा सामना करावा लागला तेव्हा ते खूप कठोर झाले. त्याचप्रमाणे भारतातील कायदा आणि भ्रष्टाचाराचा प्रश्न येतो तेव्हा भाजप कठोर बनतो. पवनपुत्र करू शकत नाही असे एकही काम नाही, भाजपही त्याच प्रेरणेने जनतेचे प्रश्न सोडवण्यात व्यस्त आहे असे सांगितले.

आज आपण देशाच्या कानाकोपऱ्यात भगवान हनुमानाची जयंती साजरी करत आहोत. आजही हनुमानजींचे जीवन भारताच्या विकासाच्या प्रवासात आपल्याला प्रेरणा देते. आज सर्वत्र बजरंग बलीचे नाव गुंजत आहे. हनुमानजीमध्ये अफाट शक्ती आहे, परंतु ते या शक्तींचा वापर तेव्हाच करू शकतात जेव्हा त्यांचा स्वत;वरील संशय संपेल . २०१४ पूर्वी भारतातही अशीच परिस्थिती होती. पण आज त्या बजरंगबलीसारख्या महासत्तेप्रमाणे भारताला आपल्यातील सुप्त शक्तींचा साक्षात्कार झाला आहे.

नैराश्याने ग्रासलेले लोक माझी कबर खोदण्यास निघालेत
आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस आणि घराणेशाहीवर जोरदार हल्ला चढवला. द्वेषाने पछाडलेले लोक आज वारंवार खोटं बोलत आहेत. हे लोक नैराश्याने ग्रासले आहेत. त्यामुळेच ते मोदी तुमची कबर खोदू असं म्हणत आहेत. ते माझी कबर खोदण्याच्या कामाला लागले आहेत. पण साम्राज्यवादी मानसिकता असलेल्या पक्षांना एक गोष्ट कळत नाही की दलित, आदिवासी, महिला, माता, तरुण आणि गरीब लोक भाजपच्या पाठी खंबीरपणे उभे राहून भाजपचं कमळ फुलवत आहेत, हे या लोकांना माहीत नाहीये. या राजकीय पक्षांची आमच्याविरुद्ध कारस्थान सुरूच असतात असे जोरदार टीकास्त्र पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सोडले.

२०१४ भारताच्या नव्या प्रवासाचा शंखनाद होता.
वर्ष २०१४ मध्ये जे काही झाले ते केवळ सत्ता परिवर्तन नव्हते तर तो भारताच्या नव्या प्रवासाचा तो शंखनाद होता. हरवलेले वैभव परत मिळवण्यासाठी राष्ट्र पुन्हा पेटून उठले. आव्हाने हळूहळू कमकुवत होत आहेत. इंग्रज १९४७मध्ये गेले पण इथल्या जनतेला गुलाम ठेवण्याची मानसिकता येथेच सोडून गेले. सत्तेचा जन्मसिद्ध हक्क मानणारा वर्ग भरभराटीला आला. त्याची साम्राज्यवादी मानसिकता होती. देशातील जनतेला नेहमीच आपले गुलाम मानले.

हे ही वाचा:

पाकिस्तानचा जीडीपी आणखी आटण्याची भीती

सर्वशक्तिमान, संगीतज्ञानमहंता हनुमान

मुंबईतील कोरोनाने ओलांडला २०० रुग्णांचा टप्पा

मारहाण प्रकरणातील महिला गर्भवती नसल्याचा नारायण राणेंचा दावा

कमी लेखणे, छोटी स्वप्ने दाखवणे काँग्रेसची संस्कृती
जनसंघाचा जन्म झाला तेव्हा त्यावेळी आमच्याकडे फारसा राजकीय अनुभव नव्हता, साधनेही नव्हती! पण आमच्याकडे लोकशाहीची ताकद होती. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या मंत्राने भाजप काम करत आहे. ‘सर्व पक्ष हे कुटुंबवाद, घराणेशाही आणि प्रादेशिकतेचे वंशज आहेत. कमी लेखणे, छोटी स्वप्ने दाखवणे ही काँग्रेसची संस्कृती आहे. एकमेकांच्या पाठीवर थाप मारण्यात काँग्रेसला इतिकर्तव्यता वाटते . मात्र एकमेकांसाठी धडपडण्याची भाजपची संस्कृती आहे असे पंतप्रधान म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा