23 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरबिजनेसअंबानीही एलआयसीच्या वाटेवर?

अंबानीही एलआयसीच्या वाटेवर?

Google News Follow

Related

आतापर्यंतचा देशातील सर्वात मोठ्या एलआयसीच्या आयपीओची घोषणा करण्यात आली होती. गुंतवणूकदारांचे लक्ष पूर्ण एलआयसी आयपीओकडे लागले असतानाच त्याहीपेक्षा मोठ्या आयपीओची माहिती समोर अली आहे. ती म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रमुख मुकेश अंबानी लवकरच त्यांच्या दोन मोठ्या कंपनीचे मेगा आयपीओची घोषणा करण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड या दोन कंपन्यांचे या वर्षात लवकरच आयपीओ येऊ शकतात.

हिंदू बिझनेस लाइनच्या वृत्तानुसार, कंपनीच्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी या मेगा आयपीओची घोषणा करू शकतात. जवळपास डिसेंबर २०२२ पर्यंत रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडचा आयपीओ लाँच करण्याची अपेक्षा आहे. तसेच २०२० मध्ये रिलायन्स जिओने फेसबुक आणि गुगलसह तेरा गुंतवणूकदारांना 33 टक्के हिस्सा विकला होता, ज्याचा एक भाग त्यांच्याद्वारे आयपीओमध्ये ऑफर केला जाऊ शकतो.

रिलायन्स रिटेल व्हेंचर्स जे किराणा सामान, पोशाख, इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी अनेक वस्तू विकते, त्यांचे भारतात जवळपास १४ हजार ५०० स्टोअर्स आहेत आणि ती देशातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. डिसेंबर २०२१ मध्ये एकाच तिमाहीत कंपनीचा महसूल तब्बल ५० हजार ६५४ कोटी होता. सप्टेंबर २०२० मध्ये, सिल्व्हर लेक या खाजगी इक्विटी कंपनीने रिलायन्स रिटेल व्हेंचर्सचे १ पूर्णांक ७५ टक्के स्टेक खरेदी केले, त्याचे मूल्य सुमारे ४ लाख तीस हजार कोटी होते. तेव्हापासून रिलायन्स रिटेल व्हेंचर्सचे उत्पन्न झपाट्याने वाढले. सिल्व्हर लेक ही अमेरिकन ग्लोबल प्रायव्हेट इक्विटी फर्म आहे जी तंत्रज्ञान आणि संबंधित उद्योगांमध्ये गुंतवणूक करते. १९९९ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान गुंतवणूकदारांपैकी एक आहे.

रिलायन्स रिटेल व्हेंचर्स प्रमाणेच मुकेश अंबानींचे टेलिकॉम इंडस्ट्रीतीमध्ये देखील वर्चस्व आहे. मुकेश अंबानींची रिलायन्स जिओ ही जगातील सर्वात मोठी टेलिकॉम सर्विस देणाऱ्यांपैकी एक आहे. रिलायन्स जिओचे जवळपास ४२० दशलक्ष सदस्य असून, या कंपनीचे मूल्य जवळपास ९९ बिलियन डॉलर आहे. या दोन्ही कंपन्या प्रत्येकी आयपीओतुन ५० हजार ते ७५ हजार कोटी रुपयांची मोठी रक्कम उभी करण्याची तयारी करत आहेत. तसे झाल्यास भारतीय बाजारातील आतापर्यंतचे हे दोन सर्वात मोठे आयपीओ असतील.

सर्वात महत्वाचे म्हणजे रिलायन्स जिओ फॉरेनमध्ये सुद्धा लिस्ट होऊ शकते. म्हणजे आपल्या देशात जसे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे. त्याचप्रमाणे यूएस स्टॉक मार्केट Nasdaq मध्ये सुद्धा लिस्टेड होऊ शकते. Nasdaq मध्ये जगातील टेक संबंधित मोठमोठया कंपन्या लिस्टेड आहेत. Nasdaq हे टेक दिग्गजांसाठी जगातील सर्वात मोठा शेअर बाजार आहे.

हे ही वाचा:

‘४८ तासांत उद्धव, संजय राऊत माफी मागा…’

वीजसंकटावर गृहमंत्री अमित शहा उचलणार पाऊल

बर्लिनमध्ये लहान मुलीच्या चित्राचे केले पंतप्रधान मोदींनी कौतुक

‘शिवसेना नेत्यांना बुद्धिदोष झाला आहे’ आशीष शेलारांची टीका

त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचे हे दोन आयपीओ आले तर ते भारतातील आतापर्यंतचे सर्वात मोठे आयपीओ असतील. मात्र हे दोन आयपीओ येईपर्यंत आगामी काळात येणारा एलआयसीचा आयपीओ सर्वात मोठा ठरण्याची अपेक्षा आहे. या आयपीओच्या माध्यमातून २१ हजार कोटी रुपये मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याआधी २०२१ मध्ये पेटीएमचा १८ हजार ३०० कोटींचा आयपीओ आला होता. तर २०१० मध्ये कोल इंडियाचा १५ हजार ५०० कोटी रुपयांचा आयपीओ आला होता आणो २००८ मध्ये रिलायन्स पॉवरचा ११ हजार ७०० कोटींचा आयपीओ आला होता. आता रिलायन्स जिओ आणि रिलायन्स व्हेंचर्सच्या आयपीओची संपूर्ण माहिती त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कळेल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा