31 C
Mumbai
Thursday, May 28, 2026
घरबिजनेसरशियाची सोन्याची विक्री वाढली

रशियाची सोन्याची विक्री वाढली

युद्धखर्च भागवण्यासाठी पुतीन यांचा मोठा निर्णय

Google News Follow

Related

युक्रेन युद्धामुळे आर्थिक दबाव वाढत असताना रशियाने आता आपल्या सुवर्णसाठ्याची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू केली आहे. गेली दोन दशके सातत्याने सोन्याची खरेदी करणाऱ्या रशियाने आता विक्रीचा सपाटा लावल्याने जागतिक अर्थकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे २००२ नंतर प्रथमच रशियाच्या सुवर्णसाठ्यात एवढी मोठी घट नोंदवली गेली आहे.

रशियाकडे सध्या सुमारे २,३०० टनांहून अधिक सोन्याचा साठा असून त्याची किंमत अब्जावधी डॉलर्समध्ये आहे. मात्र युक्रेन युद्ध, पाश्चिमात्य देशांचे निर्बंध आणि वाढता सरकारी खर्च यामुळे रशियन अर्थव्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळेच रशियाने २०२६ च्या सुरुवातीच्या काही महिन्यांतच तब्बल २८ टन सोन्याची विक्री केली आहे. मे महिन्यातही लाखो औंस सोनं बाजारात विकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा:
इबोला विषाणूचा सामना करणाऱ्या काँगोला भारताचा मदतीचा हात

₹१५ हजार कोटींचा स्वदेशी फायटर जेट प्रकल्प…

मुंबईहून सिकंदराबादला आणली जात असलेली १.२२ कोटी रुपयांची रोकड जप्त

बंदर अब्बास विमानतळाजवळील हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल इराणकडून अमेरिकन तळावर हल्ला

अहवालानुसार, २०२२ ते २०२५ या कालावधीत रशियाने जवळपास १५० अब्ज डॉलर्स किमतीचे सोने विकले. भारतीय चलनात ही रक्कम सुमारे १४.७३ लाख कोटी रुपयांच्या आसपास जाते. त्यामुळे रशियाचा हा निर्णय केवळ आर्थिक व्यवहार नसून संभाव्य आर्थिक संकटाची चाहूल मानली जात आहे.

विशेष म्हणजे २००२ ते २०२५ या काळात रशियाने जगातील सर्वाधिक म्हणजे जवळपास १,९०० टन सोन्याची खरेदी केली होती. त्यावेळी अमेरिका आणि युरोपवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी रशियाने मोठ्या प्रमाणात सोनं साठवून ठेवले होते. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. युद्धामुळे महसूल कमी होत असताना संरक्षण खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे सरकारी तूट भरून काढण्यासाठी रशियाला सुवर्णसाठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

तज्ज्ञांच्या मते, रशियाने गेल्या काही वर्षांत कमी दरात खरेदी केलेले सोनं आता विक्रमी दराने विकून मोठा नफा कमावला आहे. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्याने रशियाला तात्पुरता आर्थिक दिलासा मिळत असला तरी सततची विक्री दीर्घकालीन अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरू शकते. कारण सोनं हे कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थैर्याचं महत्त्वाचं प्रतीक मानलं जातं.

युक्रेन युद्ध किती काळ चालणार आणि पाश्चिमात्य निर्बंध किती कठोर होणार यावर पुढील काळात रशियाच्या अर्थव्यवस्थेचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. मात्र सध्या तरी रशियाने सुवर्णसाठा विकण्याचा घेतलेला निर्णय जागतिक बाजाराचे लक्ष वेधून घेत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
309,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा