22 C
Mumbai
Thursday, January 29, 2026
घरबिजनेसशेअर बाजाराची ५० हजारी भरारी

शेअर बाजाराची ५० हजारी भरारी

Google News Follow

Related

कोविडच्या काळात अवघे जग थबकले असताना शेअर बाजाराची आगेकूच सुरू होती. परदेशी गुंतवणुकीचा ओघ सुरू असल्यामुळे निर्देशांक रोज नवी उंची गाठत होता. हा सिलसिला सुरू असून आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने ५० हजाराचा महत्वाचा टप्पा पार केला. मार्केटच्या अखेरच्या सत्रात बाजारात काही प्रमाणात घसरण होऊन बाजाराचा निर्देशांक ४९६२४.७६ वर बंद झाला.

आजचा दिवस शेअर मार्केटसाठी ऐतिहासिक ठरला. बॉम्बे स्टॉक एक्सेंजने ५० हजाराचा विक्रमी टप्पा पार केला. निफ्टीनेही १४ हजार ७०० चा उच्चांक गाठला. बाजारात बँक आणि ऑटो शेअरमध्ये जबरदस्त तेजी होती. बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज, अल्ट्रा टेक सिमेंट, टेक महिंद्रा, एचसीएल टेक्नोलॉजी, इंड-सिंध बँक, बजाज ऑटो या कंपन्यांच्या शेअर्सनी तेजीचे नेतृत्व केले. इंडीगो पेण्ट्स, इंडीयन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा छप्परफाड प्रतिसाद मिळाला.
कोविड-१९ मुळे मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये विक्रमी घसरण झाली होती. ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक एका झटक्यात मार्केटमधून बाहेर पडली. शेअरच्या किमती कोसळल्या. २३ मार्च २०२० ला निर्देशांक २५ हजार ९८१ वर आला होता. अवघ्या नऊ महिन्यात झालेली पडझड भरून काढत बाजाराने ५० हजारांचा टप्पा पार केला.
नोव्हेंबर २०२० मध्ये बाजारात परकीय गुंतवणुकीचा अति प्रचंड ओघ सुरू झाला. मार्चमध्ये बाजारातून बाहेर गेले ६३ हजार कोटी एका महिन्यात बाजारात परतले. परकीय गुंतवणुकदारांनी यात आघाडी घेतली होती. देशी गुंतवणुकदार संस्था शेअर्स विकून जोरदार नफा कमावत असताना परकीय गुंतवणुकदार संस्था मात्र सातत्याने खरेदी करत होते. मार्चमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्यांची रक्कम दुप्पट, तिप्पट झाली.
कोविड-१९ मुळे जग चीनच्या विरोधात गेले. चीनवर नाराज झालेले देश भारताकडे वळल्याचा फायदा भारतीय कंपन्यांना झाला. शेअर मार्केटमध्येही याचा प्रभाव दिसला. गेल्या काही महिन्यांमध्ये परदेशी गुंतवणुकदार संस्था बरोबरच छोट्या गुंतवणुकादारांनी (रॉबिनहूड) चांगली गुंतवणूक केली.
‘जगाच्या अर्थकारणात प्रचंड पडझड होत असताना भारतीय शेअर बाजाराची ही भरारी लक्षणीय म्हणावी अशीच आहे. देशाचे अर्थकारण चमकत असल्याचे हे चिन्ह असून आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने सुरू झालेली ही वाटचाल आहे.’ असे मत शेअर बाजाराचे विश्लेषक प्रशांत कारुळकर यांनी व्यक्त केले आहे. ‘बाजारात प्रचंड तेजी असताना छोट्या गुंतवणूकदारांनी सावधपणे पावले टाकण्याची गरज असते,’ अशी सूचनाही त्यांनी केली.

बदलते अर्थकारणाचे प्रतिबिंब शेअर मार्केटमध्येही दिसते आहे. बाजारात टाटा मोटर्स सारख्या अनेक कंपन्यांनी उत्तम कामगिरी केली आहे. अशा कंपन्यांवर लक्ष ठेऊन गुंतवणूक केल्यास गुंतवणुकदारांना चांगला परतावा मिळेल असे मत शेअर विश्लेषक श्रीकांत इंगळे यांनी व्यक्त केले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा