30 C
Mumbai
Thursday, November 19, 2026
घरबिजनेसचांदीच्या दरात एका दिवसात किलोमागे ५ हजारांची घसरण

चांदीच्या दरात एका दिवसात किलोमागे ५ हजारांची घसरण

ग्राहकांना दिलासा

Google News Follow

सोन्यापाठोपाठ आता चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. गुरुवारी, १९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात चांदीचा दर प्रति किलो १ लाख ६१ हजार ०५० रुपयांवर आला आहे. एका दिवसात किलोमागे तब्बल ५ हजार रुपयांची घट झाली आहे. ही घसरण सुमारे २.४३ टक्के आहे. १०० ग्रॅम चांदीचा दर २० हजार ९० रुपये, तर १० ग्रॅमचा दर २ हजार ९ रुपये झाला आहे. नोव्हेंबर महिन्यातील आतापर्यंतचा हा नीचांकी दर असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसते.

चांदीच्या दरातील घसरणीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील आर्थिक घडामोडी महत्त्वाच्या ठरत आहेत. अमेरिकन डॉलर मजबूत होणे, अमेरिकेतील सरकारी रोख्यांवरील परतावा वाढणे आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरविषयक धोरणाबाबतची अनिश्चितता यामुळे मौल्यवान धातूंवर दबाव निर्माण झाला आहे. १८ नोव्हेंबर रोजी एमसीएक्सवर चांदीच्या वायद्याच्या दरात ५.२८ टक्क्यांची घसरण होऊन तो १ लाख ६० हजार ७३४ रुपये प्रति किलोवर बंद झाला. एका सत्रातील ही मोठी घसरण मानली जात आहे.

हे ही वाचा:
न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज!

महाराष्ट्राच्या धरणांमधील पाणीसाठा ६४ टक्क्यांवर!

काश्मीरमधील शेवटचा ज्ञात स्थानिक लश्कर दहशतवादी ठार

अमेरिकेतून हद्दपार होताच खलिस्तान समर्थकाला अटक

दरम्यान, गुरुवारी दुपारी १२.४३ वाजता एमसीएक्सवर ४ डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठी चांदीचा वायदेभाव १ लाख ६१ हजार ५८० रुपये प्रति किलो होता. मागील बंद भावाच्या तुलनेत त्यात ८४६ रुपयांची म्हणजेच ०.५३ टक्क्यांची वाढ झाली होती. यावरून किरकोळ बाजारातील दर आणि वायदे बाजारातील व्यवहार यांच्यात फरक असल्याचे स्पष्ट होते. मुंबईत चांदीचा किरकोळ दर प्रति किलो १ लाख ८४ हजार ९०० रुपये नोंदवण्यात आला होता.

चांदीच्या किमतीतील या चढ-उतारांमुळे ग्राहक आणि गुंतवणूकदार दोघांचेही लक्ष बाजाराकडे लागले आहे. सौरऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स आणि औद्योगिक उत्पादन क्षेत्रात चांदीला मोठी मागणी असल्याने तिच्या किमतीवर केवळ गुंतवणुकीचाच नव्हे, तर औद्योगिक मागणीचाही परिणाम होतो. सध्याच्या घसरणीमुळे चांदी खरेदीदारांना संधी मिळू शकते; मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता लक्षात घेता दर पुन्हा वाढण्याची किंवा आणखी घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्यक्ष खरेदी करताना जीएसटी आणि घडणावळ शुल्कही विचारात घेणे आवश्यक आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा