28.7 C
Mumbai
Monday, October 26, 2026
घरबिजनेसभारतीय ऑफिस स्पेस मार्केटमध्ये तेजी कायम

भारतीय ऑफिस स्पेस मार्केटमध्ये तेजी कायम

Google News Follow

भारताच्या ऑफिस स्पेस मार्केटमध्ये कॅलेंडर वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत लीजिंग वार्षिक आधारावर ३५ टक्क्यांनी वाढून १६.३ दशलक्ष चौरस फूट झाली आहे. ही माहिती मंगळवारी जाहीर झालेल्या अहवालात देण्यात आली. रिअल इस्टेट सेवा कंपनी कुशमॅन अँड वेकफील्ड च्या अहवालानुसार, वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत बाजारात ४४.३ दशलक्ष चौरस फूट ऑफिस स्पेसची नेट लीजिंग झाली आहे, जी २०२४ मध्ये झालेल्या एकूण लीजिंगच्या ८७ टक्के आहे.

विश्लेषकांचे म्हणणे आहे की हे क्षेत्र गेल्या वर्षीच्या ५०.७ दशलक्ष चौरस फूट या विक्रमी आकड्यालाही मागे टाकण्याच्या मार्गावर आहे, ज्यामुळे यावर्षी ऑफिस स्पेस लीजिंगचा नवा विक्रम होण्याची शक्यता आहे. ऑफिस स्पेस लीजिंगमध्ये दिल्ली-एनसीआर आणि बंगळुरू अव्वल ठरले असून, येथे अनुक्रमे ३.८ दशलक्ष चौरस फूट आणि ३.५ दशलक्ष चौरस फूट लीजिंग नोंदवली गेली अहवालात सांगितले की या काळात झालेल्या एकूण लीजिंगमध्ये ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCC) चा वाटा ३२ टक्के, IT-BPM क्षेत्राचा ३१ टक्के, इंजिनीअरिंग व मॅन्युफॅक्चरिंगचा १८ टक्के, BFSI क्षेत्राचा १४ टक्के आणि फ्लेक्सिबल वर्कस्पेस ऑपरेटरचा ११ टक्के होता.

हेही वाचा..

चिराग पासवान यांनी प्रशांत किशोर यांची केली केजरीवाल यांच्याशी तुलना

पाकिस्तानच्या क्वेटामध्ये बॉम्बस्फोट; फ्रंटियर कॉर्प्स मुख्यालयाजवळ गोळीबार

उत्तराखंड ग्रामीण बँकेचे माजी व्यवस्थापक दोषी

नाहीतर पाकिस्तानने स्वतःलाच विजेता घोषित केले असते

कुशमॅन अँड वेकफील्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत, दक्षिण-पूर्व आशिया आणि आशिया-प्रशांत कार्यालय व किरकोळ व्यवसाय) अंशुल जैन म्हणाले, “बाजार आता विस्ताराच्या चक्रात ठामपणे प्रवेश करत आहे आणि तिसऱ्या तिमाहीतील ८० टक्क्यांहून अधिक लीजिंग नवीन अधिग्रहणांमुळे झाले आहे. तिसऱ्या तिमाहीत पूर्ण झालेल्या सुमारे ८० टक्के मालमत्ता ग्रेड-A+ दर्जाच्या होत्या, ज्यामुळे प्रीमियम व भविष्यकालीन कार्यस्थळांकडे होणारा स्पष्ट कल दिसतो.” रिअल इस्टेट सेवा कंपनीने सांगितले की नव्या लीजिंगमध्ये तिमाही आधारावर २१ टक्क्यांची वाढ झाली असून, वार्षिक आधारावरही किरकोळ वाढ दिसून आली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा