30 C
Mumbai
Thursday, November 26, 2026
घरक्राईमनामाएमएच्या परीक्षेत 'डमी' विद्यार्थिनीचा भंडाफोड

एमएच्या परीक्षेत ‘डमी’ विद्यार्थिनीचा भंडाफोड

नागपाड्यातील महाविद्यालयात खळबळ

Google News Follow

मुंबई विद्यापीठाच्या एम.ए. भाग-२ (सत्र ३) च्या परीक्षेत दुसऱ्या विद्यार्थिनीच्या जागी परीक्षा देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नागपाडा येथील महाराष्ट्र कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्समध्ये २० नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला. विद्यापीठाच्या भरारी पथकाने केलेल्या अचानक तपासणीत १९ वर्षीय तरुणीला डमी परीक्षार्थी म्हणून रंगेहात पकडण्यात आले. हॉल तिकिटावरील छायाचित्र आणि प्रत्यक्ष परीक्षा देणाऱ्या तरुणीच्या चेहऱ्यात तफावत आढळल्याने हा गैरप्रकार उघड झाला.

परीक्षेदरम्यान भरारी पथकातील प्राचार्य समीर नाईक आणि स्मिता साळुंखे यांनी महाविद्यालयाला अचानक भेट दिली होती. ब्लॉक क्रमांक ३५ मध्ये तपासणी सुरू असताना एक विद्यार्थिनी अस्वस्थ आणि घाबरलेल्या अवस्थेत दिसून आली. तिच्या वागण्यावर संशय आल्याने पथकाने हॉल तिकिटाची पडताळणी केली. यावेळी ती मूळ परीक्षार्थी नसल्याचे स्पष्ट झाले. चौकशीदरम्यान संबंधित तरुणीने आपले नाव सबरीन परवेझ खान (१९) असून ती कुर्ला पश्चिम येथील रहिवासी असल्याचे सांगितले. ती अकबर पीरभोय कॉलेजमध्ये बीएससी आयटीच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे.

हे ही वाचा:
आयआरसीटीसी घोटाळ्यात आरोप निश्चितीचा आदेश कायम

गुरनूरला संधीचे संकेत; अंशुलच्या पाठीशी मॉर्केल ठाम!

मुंबईने उत्तराखंडला ८६ धावांनी लोळवले!

माहीममधील ज्वेलर्सवर गोळीबारामागे १० कोटींच्या खंडणीचा डाव!

सबरीन परवेझ ही मूळ परीक्षार्थी सबरीन सुलतान खान (२२) हिच्या जागी परीक्षा देण्यासाठी आल्याचे चौकशीत समोर आले. मूळ विद्यार्थिनीने परीक्षेला न येता तिला आपल्या जागी पाठवले होते. या प्रकारानंतर महाविद्यालय प्रशासनाने संबंधित तरुणीचे हॉल तिकीट, ओळखपत्र, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका जप्त केली. केंद्र संचालकांच्या तक्रारीवरून नागपाडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, या परीक्षा गैरप्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू केला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा