पंजाबमधील मोहाली येथे एका कबड्डी खेळाडूची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली. स्पर्धेत सहभागी असताना अज्ञात हल्लेखोरांनी कबड्डी खेळाडूची गोळ्या घालून हत्या केली. मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी सेल्फी काढण्याच्या बहाण्याने पीडित राणा बालाचौरिया याच्याकडे जाऊन गोळीबार केला. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून बंबीहा टोळीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या टोळीने दावा केला आहे की, संबंधित कबड्डी खेळाडूने पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या मारेकऱ्यांना आश्रय दिला होता.
राणा हा गोळीबारानंतर गंभीर जखमी झाला आणि त्याला मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. राणा याच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या वरच्या भागात चार ते पाच गोळ्या लागल्या होत्या.
मोहालीचे एसएसपी हरमनदीप हंस म्हणाले की, दोन ते तीन हल्लेखोर फोटो काढण्याच्या बहाण्याने खेळाडूंकडे आले आणि अचानक गोळीबार केला. आम्ही अधिकचा तपशील मिळवत आहोत आणि माहिती गोळा करत आहोत. सध्याच्या तपासावरून घटनेमागील खऱ्या दृष्टिकोनावर भाष्य करू शकत नाही, असे एसएसपी म्हणाले. माहितीनुसार, राणा याच्यावर जवळून चार ते पाच गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिस या प्रकरणाचा तपास अनेक दृष्टिकोनातून करत आहेत, ज्यामध्ये गुंडांच्या संभाव्य दुव्याचाही समावेश आहे.
हे ही वाचा:
“पाकिस्तान म्हणजे जागतिक दहशतवादचं केंद्र!”
पश्चिम बंगाल: आज जाहीर होणार प्रारूप मतदार यादी; ५८ लाखांहून अधिक नावे वगळणार
“… तर भारताचा ईशान्य भाग वेगळा होईल!” बांगलादेशी नेत्याने भारताविरुद्ध ओकले विष
“संजौली मशिदीचे अनधिकृत मजले हवेतर आम्ही मोफत पाडू!”
दरम्यान, एका पोस्टमध्ये, बंबीहा टोळीने दावा केला आहे की राणा हा लॉरेन्स बिश्नोई या प्रतिस्पर्धी टोळ्यांसोबत काम करायचा. बंबीहा टोळीशी संबंधित असलेल्या एका छोट्या टोळीने पोस्ट केलेल्या इन्स्टाग्राम रीलमध्ये पंजाबी भाषेत म्हटले आहे की हा हल्ला २०२२ मध्ये मुसेवालाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी होता, असा दावा केला आहे की राणा बालाचौरिया लॉरेन्स बिश्नोई आणि जग्गू भगवानपुरियाच्या टोळ्यांशी जोडलेला होता. तसेच खेळाडूंना जग्गूने “प्रायोजित” केलेल्या कबड्डी संघांसाठी न खेळण्याचा इशारा दिला होता. पोस्टमध्ये अनेक व्यक्तींची नावे देण्यात आली होती आणि पीडितेचे प्रतिस्पर्धी टोळ्यांशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. पोलिस अधिकाऱ्यांनी याची दखल घेतल्याची पुष्टी केली आहे आणि पोस्टमधील दाव्यांचे हत्येशी मूसेवालाच्या हत्येचे संबंध असल्याचे पडताळण्यासाठी ते सक्रियपणे काम करत आहेत.







