32 C
Mumbai
Monday, June 21, 2021
घर क्राईमनामा उत्तेजित करणाऱ्या औषधाच्या नावाखाली विदेशी नागरिकांना गंडवले

उत्तेजित करणाऱ्या औषधाच्या नावाखाली विदेशी नागरिकांना गंडवले

Related

बोगस कॉल सेंटर उद्ध्वस्त

उत्तेजित आणि शक्तिवर्धक औषधाच्या नावाखाली परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या जोगेश्वरीतील एका बोगस कॉल सेंटरवर मुंबई गुन्हे शाखेने छापा टाकून १० जणांना अटक केली असून त्यात एका महिलेचा देखील समावेश आहे. तालिब दिलबर खैरानी, विकास जानकी सिंह, मोहम्मद ताहीर मोहम्मद तारीक कुरेशी, असगर मोहम्मद अली शेख, तबरेज आलम मेहबूब इद्रीसी, शाहरुख नवाब खान, अभिषेक अमरजीत अरोरा, दानिश नसीर हसन शेख, अफशीन तालिब जमालउद्दीन गझाली आणि रिझवान जाफर हुसैन शेख अशी अटक करण्यात आलेल्या  दहाजणांची नावे आहेत.

जोगेश्वरीतील लिंक रोड, बेहराम बाग, रेंज हाईट्स इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये बोगस कॉल सेंटर सुरु असून त्या ठिकाणी विदेशी नागरिकांना उत्तेजित आणि शक्तिवर्धक औषधे देण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात येत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९च्या अधिकाऱ्यांना मिळाली.

हे ही वाचा:

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी लस घेतली का?

मालवणी इमारत दुर्घटना: केंद्र सरकारने जाहीर केली मदत

दोन महिला मॅनहोलमध्ये पडल्या; पालिकेचे दावे पडले उघडे

येत्या निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील

या माहितीच्या आधारे प्रभारी पोलीस निरीक्षक संजय खताळे यांच्या पथकाने रेंज हाईट्स अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक ४०५ वर छापा टाकला होता, यावेळी तिथे काहीजण विदेशी नागरिकांना व्हियाग्रा, सियालिस, लिव्हीटराया या सेक्ससंबधित औषधांची विक्री करीत असल्याचे भासवून त्यांच्याकडून पैशांची मागणी करुन फसवणूक करीत असल्याचे दिसून आले. यावेळी तिथे असलेल्या टिम लिडर तालिब खैरानी, डाटा एन्ट्री ऑपरेट अफशीन गझाली आणि आठ ओपनर आणि एजंट अशा दहाजणांना पोलिसांनी अटक केली.

या कारवाईत पोलिसांनी दहा हार्डडिस्क, एक लॅपटॉप, एक राऊटर, दहा मोबाईल, मिडीया कनव्हर्टर आदी मुद्देमाल जप्त केला आहे. याच गुन्ह्यांत पाचजणांना फरार आरोपी दाखविण्यात आले असून त्यात कॉल सेंटरच्या दोन चालकासह तीन मदतनीसाचा समावेश आहे. अटकेनंतर या सर्वांना पुढील चौकशीसाठी ओशिवरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते, अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या इतर सहकार्‍यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा