दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर फरीदाबादमधील अल- फलाह विद्यापीठ तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. नुकतेच अल- फलाह विद्यापीठावर सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकले होते. याशिवाय या विद्यापीठाच्या कुलगुरूंना देखील अटक करण्यात आली आहे. अशातच आता या प्रकरणात मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यापीठातून किमान १० लोकं बेपत्ता असल्याचे उघडकीस आले आहे.
जम्मू- काश्मीर आणि हरियाणा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईनंतर विद्यापीठातील १० व्यक्तींच्या बेपत्ता होण्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. ही १० लोकं विद्यापीठात काम करत होते किंवा विद्यार्थी होते, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. माहितीनुसार, या १० लोकांचे फोन स्विच ऑफ आहेत.
तपास यंत्रणांनी हे बेपत्ता लोक टेरर डॉक्टर मॉड्युलचे भाग असू शकतात अशी शंका व्यक्त केली आहे. अधिकारी म्हणत आहेत की, अद्याप निश्चित निष्कर्ष काढणे खूप लवकर होईल परंतु, बेपत्ता झालेले लोक हे दहशतवादी डॉक्टर मॉड्यूलशी संबंधित असू शकतात.
माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद ही पाकिस्तानी दहशतवादी संघटना दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील स्फोटाच्या मागे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांनी नुकतेच आत्मघातकी हल्ल्यांसाठी फंडिग करण्याचे आवाहन देखील केले होते. त्यासाठी त्यांनी पाकिस्तानी SadaPay ऍपचा वापर केला होता. या हल्ल्यात महिलांची मुख्य भूमिका असल्याचा देखील संशय तपास यंत्रणांना आहे.
हे ही वाचा:
“निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचे काम राहुल गांधी करतायेत” २७२ दिग्गजांनी लिहिले पत्र
दिल्ली स्फोटामागे पाकचा हात असल्याची कबुली? पाकिस्तानी नेते चौधरी अन्वरुल हक काय म्हणाले?
मनसेमुळे उद्धव ठाकरेंना काँग्रेसने दिला डच्चू? काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?
सम्राट चौधरी, विजय सिन्हाचं राहणार बिहारचे उपमुख्यमंत्री!
जैश-ए-मोहम्मदची महिला शाखा असून दहशतवादी मसूद अझरची बहीण सादिया सध्या या महिला शाखेचं नेतृत्व करत आहे. ही शाखा ऑपरेशन सिंदूरनंतर तयार करण्यात आली आहे. या हल्ल्यात भारतीय लष्करानं पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदचा भागलपूर येथील कॅम्प उद्ध्वस्त केला होता. दरम्यान, लाल किल्ला परिसरातील स्फोटातील मुख्य संशयित डॉक्टर शाहिना सईद जी मॅडम सर्जन या टोपण नावानं ओळखली जाते तिच्याकडे या हल्ल्यासाठीचे पैसे गोळा करण्याची जबाबदारी असावी असा अंदाज तपास यंत्रणांना आहे.







