33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरक्राईमनामादिल्लीत १०५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स काळ्याबाजारातून जप्त

दिल्लीत १०५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स काळ्याबाजारातून जप्त

Google News Follow

Related

देशात कोरोनाचा कहर झालेला आहे. दिल्लीत अनेक रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचा मृत्यु होत आहे. अशा वेळी काही समाजकंटकांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा काळाबाजार करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी हाणून पाडला आहे. खान मार्केटमधील खान चाचा आणि टाऊन हॉल या दोन रेस्टॉरंटमधून एकूण १०५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स दिल्ली पोलिसांनी जप्त केले आहेत.

शुक्रवारी (०७ मे) रोजी पोलिसांनी ही कारवाई केली. या दोन रेस्टॉरंटमधून मिळवलेल्या १०५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्समुळे काळ्याबाजारातून एकूण जप्त झालेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सची संख्या ५३४ पर्यंत पोहोचली आहे. खान चाचा आणि टाऊन हॉल ही दोन्ही रेस्टॉरंट नवनीत कालरा यांच्या मालकीची असून सध्या ते फरार आहेत. पोलिकांनी व्यवस्थापकासह तीन कर्मचाऱ्यांना या प्रकरणात अटक केली आहे. नवनीत कालरा यांच्याकडे या दोन रेस्टॉरंट व्यतिरिक्त दयाल ऑप्टिक्सची देखील मालकी आहे.

हे ही वाचा:

जाणत्या-अजाणत्यांचे बार बार देखो

मराठा आरक्षणासाठी नाही, बार मालकांसाठी पवारांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपसाठी भारतीय संघ जाहीर

मुंबईतल्या निवासी डॉक्टर्सची महापालिकेकडून लूट?

हे सगळे कॉन्सन्ट्रेटर मॅट्रिक्स सेल्युलर सर्व्हिस लिमिटेड या कंपनीने आयात केले होते. या कंपनीचे सीईओ गौरव खन्ना (४७) यांना पोलिसांनी शुक्रवारीच ऑर्किड अपार्टमेंट, सेक्टर ५४, गुरूग्राम येथून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मॅट्रिक्स सेल्युलर या कंपनीने एकूण ६५० कॉन्सन्ट्रेटर आयात केले होते. त्यापैकी पोलिसांनी ५२४ मिळवले आहेत. काळ्या बाजार या कॉन्सन्ट्रेटरची ७१ हजार रुपयांपर्यंत विक्री केली जात होती.

यापूर्वी दिल्लीच्या विविध रेस्टॉरंटमधून पोलिसांनी ४१९ कॉन्सन्ट्रेटर जप्त केले होते. या कॉन्सन्ट्रेटर्सची सुमारे ३.५ पट जास्त किंमतीने विक्री केली जात होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा