23 C
Mumbai
Saturday, December 27, 2025
घरक्राईमनामामध्य प्रदेशमध्ये १२ वर्षीय मुलीवर बलात्कार

मध्य प्रदेशमध्ये १२ वर्षीय मुलीवर बलात्कार

मंदिर ट्रस्टशी संबंधित दोघांचे घृणास्पद कृत्य

Google News Follow

Related

मंदिर ट्रस्टशी संबंधित दोन पुरुषांनी एका १२ वर्षीय मुलीला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना मध्य प्रदेशातील मैहर येथे घडली आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर पीडितेवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

मैहर शहरातील एका प्रसिद्ध मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ट्रस्टसाठी काम करणाऱ्या दोन व्यक्तींनी १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. तिला अनेकदा चावा घेतला आणि तिच्यावर अत्याचार केला, अशी माहिती मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्याच्या पोलिसांनी शुक्रवारी दिली. अटक करण्यात आलेल्या दोघांनीही गुरुवारी तिच्या गुप्तांगामध्ये अणुकुचिदार वस्तू घातल्याचे समजते, परंतु तिच्या वैद्यकीय तपासणीनंतरच याबाबत अधिक स्पष्टीकरण मिळेल, असे सूत्रांनी सांगितले.

बलात्कारानंतर या मुलीला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. त्यामुळे तिला प्रगत वैद्यकीय सेवेसाठी विभागीय मुख्यालय रीवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रवींद्र कुमार रवी आणि अतुल भडोलिया अशी आरोपींची नावे आहेत. ‘मी हे नाकारत नाही की आरोपी रवींद्र कुमार रवी आणि अतुल भडोलिया यांनी १२ वर्षीय मुलीच्या गुप्तांमध्ये काही वस्तू घातल्या होत्या. परंतु, ही अशी गोष्ट आहे जी केवळ वैद्यकीय अहवालातच स्पष्ट होऊ शकते. आम्ही अजूनही तिच्या वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहोत. तिला रक्तस्राव होत होता आणि डॉक्टर तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत,” असे सतनाचे पोलिस अधीक्षक आशुतोष गुप्ता यांनी सांगितले.

‘तिच्या शरीरावर चावा घेतल्याच्या आणि अन्य जखमा दिसत असून त्या लैंगिक अत्याचाराशी संबंधित आहेत,’ असेही ते म्हणाले. मुलीची प्रकृती आता ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्याचेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले. ‘आम्ही आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करत आहोत, असे गुप्ता म्हणाले.

दोन्ही आरोपींना शुक्रवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या दोघांवर बलात्कार, १२ वर्षांखालील महिलेवर सामूहिक बलात्कार, अल्पवयीन मुलीची खरेदी या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, दुखापत करणे, धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनी दुखापत करणे, तसेच पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मैहर येथील मां शारदा देवी मंदिर व्यवस्थापन समिती यांनीही निवेदन जाहीर करून रवी आणि भाडोलिया यांना काढून टाकल्याचे स्पष्ट केले आहे. आरोपींनी मुलीला आमिष दाखवून एका निर्जनस्थळी नेले, जिथे त्यांनी बलात्कार केला आणि मारहाण केली. मैहरचे उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीओपी) लोकेश डाबर यांनी सांगितले की, पोलिसांनी शुक्रवारी सकाळी दोघांना अटक केली. पीडितेवर मैहर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला रीवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पोलिसांना आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आणि मुलीला शक्य तितके सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले.

हे ही वाचा:

अंदमान आणि निकोबारमध्ये जोरदार भूकंप

चंद्रपुर शहराला पूराचा विळखा, अनेक गावांचा संपर्क तुटला

पुण्यात बँकेवर सायबर हल्ला; कोट्यवधी रुपये लंपास

…तर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील पीडिताला अधिकाऱ्याच्या खिशातून व्याज

मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी या घटनेचा तीव्र निषेध करून सत्ताधारी भाजप सरकारवर टीका केली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे सरकार महिलांना सुरक्षा प्रदान करण्यात अपयशी ठरल्याचे सिद्ध झाले, असा दावा नाथ यांनी एका ट्विटमध्ये केला आहे. त्यांनी मुलीसाठी सर्वोत्तम वैद्यकीय उपचार आणि एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा