22 C
Mumbai
Wednesday, January 28, 2026
घरक्राईमनामाबास्केटबॉलचा खांब अंगावर कोसळून खेळाडूचा मृत्यू

बास्केटबॉलचा खांब अंगावर कोसळून खेळाडूचा मृत्यू

रुग्णालयात उपचारापूर्वी मृत

Google News Follow

Related

हरयाणा मधील रोहतक येथे मंगळवारी सरावादरम्यान बास्केटबॉलचा स्टँडचा लोखंडी खांब अंगावर पडल्याने १६ वर्षांच्या राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल खेळाडूचा मृत्यू झाला. अपघातानंतर खेळाडूला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हा प्रकार सकाळी सुमारे १० वाजता लखन माजरा गावातील क्रीडांगणावर घडला, जिथे सदर खेळाडू एकटाच मैदानावर सराव करत होता. हा अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

व्हिडिओमध्ये खेळाडू धावत जाऊन बास्केट करण्याच्या प्रयत्नात रिंगला लटकतो, पण तेवढ्यात संपूर्ण लोखंडी खांबच त्याच्या  कोसळतो आणि बास्केटबॉल हूपचा रिंग त्याच्या छातीवर जोरात आदळते.

थोड्याच वेळात इतर खेळाडू,  त्याचे सहकारी, धावत येऊन त्याला मदत करतात. व्हिडिओमध्ये पीडित खेळाडू उठण्याचा प्रयत्न करताना तर बाकी जण खाली पडलेला खांब उचलताना दिसतात.

हे ही वाचा:

डॉ. दीपक शिकारपूर लिखित कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक ब्रेल पुस्तक प्रकाशित

हिंदूराष्ट्र घोषित करण्याची आता गरजच नाही…

दुबईस्थित ड्रग्ज तस्कर पवन ठाकूरला अटक; भारतात पाठवणार

“केंद्राने जबरदस्ती हिंदी थोपवली, तर तामिळनाडू भाषा युद्धासाठी सज्ज”

या १६ वर्षीय खेळाडूने अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकं जिंकली होती. त्यात कांग्रा येथे झालेली ४७ वी सब-ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप, हैदराबाद येथील ४९ वी सब-ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप आणि पुद्दुचेरीतील ३९ वी युवा राष्ट्रीय चॅम्पियनशिपचा समावेश आहे.

या घटनेमुळे हरयाणा मधील क्रीडा पायाभूत सुविधांच्या स्थितीबाबत चिंता वाढली आहे. कारण दोन दिवसांपूर्वी बहादूरगढ येथे अशाच प्रकारचा अपघात घडला होता.

बहादूरगढ मधील होशियार सिंग स्पोर्ट्स स्टेडियम येथे दोन दिवसांपूर्वी असाच अपघात झाला होता. सरावादरम्यान दुपारी सव्वा तीन वाजता बास्केटबॉलचा खांब पडून १५ वर्षीय मुलगा जखमी झाला होता. त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा