मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत वांद्रे येथून अमलीपदार्थाचा साठा जप्त केला आहे. मंगळवारी केलेल्या कारवाईत पोलिसांनी २८६ किलो गांजा जप्त केला आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणात ३६ वर्षीय इम्रान अन्सारी नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मंगळवारी संध्याकाळी मुंबई पोलिसांनी वांद्रे रेक्लेमेशन परिसरात छापेमारीची कारवाई केली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी २८६ किलो गांजा जप्त केला. केसी मार्ग रोड परिसरात एका गोडाऊनमध्ये हा गांजा साठवून ठेवण्यात आला होता. मुंबईत विविध ठिकाणी या गांजाचा सप्लाय करण्याच्या हेतूने हा गांजा ठेवण्यात आला होता. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ९ चे प्रमुख दया नायक यांच्या नेतृत्वाखाली ही छापेमारीची कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान ३६ वर्षीय इम्रान अन्सारी नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मुंबईच्या विविध ठिकाणी गांजा पाठवण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. यानंतर सायंकाळी साडेसात ते नऊच्या दरम्यान पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली. या गोडाऊनला टाळं लावण्यात आलं होतं. मागच्या अनेक महिन्यांपासून इम्रान अन्सारी त्याच्या साथीदारांसह इथे राहत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली होती. यानंतर गोडाऊनवर कारवाई करण्यात आली.
हे ही वाचा :
ट्रम्प- पुतिन यांच्यात दोन तास चर्चा; युद्धबंदीवर काय झाले बोलणे?
स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूलचे यशस्वी लँडिंग; सुनीता विल्यम्स २८६ दिवसांनी पृथ्वीवर परतल्या
वाहने पेटवली ती हिंदूंची, घटनेवेळी मुस्लिमांचे एकही वाहन पार्क नव्हते!
मुख्यमंत्र्यांचा जखमी पोलिसांशी संवाद; कामाचे कौतुक करत बरे होण्यासाठी दिल्या शुभेच्छा
मुंबईत २८६ किलो गांजा आला कुठून, कोणाला याची विक्री करण्यात येणार होती या अनुषंगाने मुंबई पोलिसांच्या गुन्हे ९ शाखेकडून तपास सुरू आहे. सध्या या गोडाऊनला टाळे ठोकण्यात आले असून इम्रान याच्यासोबत यामध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.







