29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरक्राईमनामामुंबई- नाशिक महामार्गावरून जप्त केला ३५.९० किलो गांजा!

मुंबई- नाशिक महामार्गावरून जप्त केला ३५.९० किलो गांजा!

Google News Follow

Related

क्रूझ पार्टी प्रकरण उघडकीस आल्यापासून एनसीबी आणि पोलिसांच्या कारवायांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान आज ठाणे पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये मुंबई- नाशिक महामार्गावर एका वाहनातून पोलिसांनी तब्बल ३५.९० किलो गांजा जप्त केला आहे. तसेच तीन ड्रग्स पेडलर्सला अटक करण्यात आली आहे.

ठाणे पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी विभागाने ही कारवाई करत तब्बल ३५.९० किलो गांजा जप्त केला आहे. मुंबई- नाशिक महामार्गावरील खारेगावजवळ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ठाणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत जप्त केलेल्या या गांजाची किंमत तब्बल ८.२२ लाख रुपये आहे. तसेच याप्रकरणी तीन अमलीपदार्थ विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे.

क्रुझ पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केल्यावर पुन्हा एकदा ड्रग्स प्रकरणांनी डोके वर काढले आहे. आर्यन खानच्या प्रकरणात आता अभिनेत्री अनन्या पांडे हिचे नाव समोर आले असून एनसीबीकडून सध्या तिची चौकशी करण्यात येत आहे.

आर्यन खान याची याचिका विशेष न्यायालयाने फेटाळल्यावर आता उच्च न्यायालय यावर सुनावणी करणार आहे. दरम्यान अनन्या पांडे हिने आर्यन खान याला ड्रग्स पुरवल्याचे एनसीबीला सांगितले आहे, त्यामुळे आता आर्यन खानच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा