28.2 C
Mumbai
Thursday, October 15, 2026
घरक्राईमनामाछत्रपती संभाजीनगरमधून ४,७६५ किलो भेसळयुक्त ‘मावा’ जप्त

छत्रपती संभाजीनगरमधून ४,७६५ किलो भेसळयुक्त ‘मावा’ जप्त

एफडीएची मोठी कारवाई

Google News Follow

Related

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शहनूर मियाँ दर्ग्याच्या परिसरातून सुमारे ४,७६५ किलो ‘माव्यासारखा’ पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या पदार्थाची अंदाजे किंमत ७.६७ लाख रुपये असल्याचे एफडीएने सांगितले.

एफडीएचे संयुक्त आयुक्त श्रीकांत करकाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेला पदार्थ शुद्ध मावा किंवा खवा नव्हता. त्यामध्ये पाम तेल, वनस्पती तूप आणि साखर यांचे मिश्रण असल्याचे आढळले. कमी खर्चात मिठाई तयार करून ती अस्सल माव्यापासून बनवलेली असल्याचे सांगत विक्री करण्यासाठी अशा पदार्थाचा वापर केला जात असल्याचे एफडीएने म्हटले आहे. एफडीएला मिळालेल्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेला माल पाठवणाऱ्या पुरवठादाराला तसेच त्याची मागणी करणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर एफडीएने अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले आहे. छत्रपती संभाजीनगर शहर तसेच परिसरातील मिठाई दुकानांची तपासणी आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा विभागाने दिला आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात राज्यभर करण्यात आलेल्या कारवाईत एफडीएने २,८१३ किलो दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जप्त केले होते. या पदार्थांची किंमत सुमारे ७.३८ लाख रुपये होती.

हे ही वाचा:

माध्यमांच्या प्रवेशबंदीनंतर व्हाइट हाऊसकडून ‘ट्रम्प टीव्ही’

भारत इंडो-पॅसिफिकमधील उदयोन्मुख महासत्ता!

सिम कार्डच्या गैरवापरावर ३ वर्षांचा तुरुंगवास

रणगाड्यांना मिळणार ‘स्वदेशी पॉवर’! ५८६ कोटींचा करार

महाराष्ट्रात अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेसाठी एफडीएकडून सुरू असलेल्या व्यापक मोहिमेअंतर्गत हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाई दुकाने आणि अन्ननिर्मिती केंद्रांची तपासणी केली जात आहे. यापूर्वी विभागाने राज्यभरातील अनेक आस्थापनांवर परवाने निलंबित करण्याची आणि सुधारणा नोटिसा बजावण्याची कारवाई केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा