28.7 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरक्राईमनामामुंबई विमानतळावर ६ कोटी रुपयांचे हायड्रोपोनिक गांजा जप्त, प्रवासी अटकेत

मुंबई विमानतळावर ६ कोटी रुपयांचे हायड्रोपोनिक गांजा जप्त, प्रवासी अटकेत

Google News Follow

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर युनिटने (AIU) एका प्रवाशाला अटक केली आहे. त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ६ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे ६,००६ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा (गंजा) जप्त करण्यात आला आहे.

आरोपीचे नाव कैस शेख असून, तो व्हिएतजेट एअरलाइन्सच्या विमानाने बँकॉकहून पहाटे १:१५ च्या सुमारास मुंबईत दाखल झाला होता. गुप्त माहितीच्या आधारे त्याला अडवण्यात आले. त्याच्या अंगझडतीत काहीही आढळले नाही, परंतु त्याच्या ‘स्कायबॅग्ज’ ट्रॉली बॅगची तपासणी केली असता, त्यात दोन कापडी पिशव्यांमध्ये १२ प्लास्टिक पॅकेट लपवलेले आढळले. तपासणीत हे पॅकेट हायड्रोपोनिक गांजाचे असल्याचे निष्पन्न झाले.

हे ही वाचा:

भारतीय क्रिकेटची भिंत चेतेश्वर पुजारा निवृत्त

नक्षलवाद्यांचा कट उधळला

राहुल गांधींचा आणखी एक दावा निघाला खोटा!

दक्षिण कोरियाच्या सैन्याने झाडल्या गोळ्या !

हा माल आपलाच असल्याचे शेखने कबूल केले आणि ‘सहज पैसे’ मिळवण्याच्या आमिषाला बळी पडून हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले. त्याला एनडीपीएस अधिनियम, १९८५ च्या विविध कलमांखाली अटक करण्यात आली आहे.
या रॅकेटमध्ये आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याचा तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा