27 C
Mumbai
Saturday, August 22, 2026
घरक्राईमनामाअभ्यास न केल्याने शिक्षिकेने थप्पड मारली; ६ वर्षांचा मुलगा तिथेच गतप्राण

अभ्यास न केल्याने शिक्षिकेने थप्पड मारली; ६ वर्षांचा मुलगा तिथेच गतप्राण

आंध्र प्रदेशच्या खासगी शाळेतील घटना

Google News Follow

Related

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये एका खासगी शाळेत सहा वर्षीय लोअर किंडरगार्टन (LKG) विद्यार्थ्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. होमवर्क पूर्ण न केल्याने शिक्षिकेने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. मारहाणीनंतर घाबरलेल्या मुलाला रडू आले आणि खोकला सुरू झाला. त्यानंतर तो अचानक कोसळला. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागला असून, त्याच्या आधारे तपास सुरू आहे. मात्र, मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

विशाखापट्टणमच्या वन टाउन परिसरातील खासगी शाळेत ही घटना घडली. पोलिसांनी मिळवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये शिक्षिका मुलाला ओरडताना दिसत आहे. त्यानंतर मुलगा रडत असून, शिक्षिकेकडे विनवणी करत असल्याप्रमाणे हातवारे करताना दिसतो. शिक्षिकेने त्याचा शर्ट आणि पँट व्यवस्थित केल्यानंतर त्याला थप्पड मारल्याचे फुटेजमध्ये दिसते. काही क्षणांतच मुलगा शिक्षिकेच्या मांडीवर कोसळतो. शिक्षकाने त्याला उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलाकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही. पोलिसांकडून या फुटेजची सखोल तपासणी केली जात आहे.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा शाळेत जाण्यापूर्वी पूर्णपणे निरोगी होता. शाळेतून त्यांना थेट फोन करण्यात आला नसल्याचा आरोपही मुलाच्या वडिलांनी केला आहे. स्थानिक स्वयंपाकी कर्मचाऱ्यांकडून घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. मुलाला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कुटुंबीयांनी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

हे ही वाचा:

इम्रान खान तपासणीनंतर पुन्हा तुरुंगात रवाना

मुंबईत पाडकामादरम्यान क्रेन रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर कोसळली

९ पेक्षा जास्त सिम कार्ड असतील तर सावधान! २४ ऑगस्टपासून नवा नियम

“भारतासाठी पाकिस्तान तातडीचा धोका, चीन दीर्घकालीन स्पर्धक”

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तींची चौकशी तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांची तपासणी केली जात आहे. मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. आंध्र प्रदेशचे मानव संसाधन विकास मंत्री नारा लोकेश यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. सहा वर्षीय मुलाचा कथित मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे पाहणे अत्यंत वेदनादायक असल्याचे त्यांनी म्हटले. दोषी व्यक्ती आणि शाळा व्यवस्थापनाविरोधात कायदेशीर कारवाई केली जात असून, सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा