32 C
Mumbai
Wednesday, April 22, 2026
घरक्राईमनामाअल्पवयीन मुलीवर बलात्कार, परवेझ पठाणसह ८ जणांची पोलिसांनी काढली धिंड!

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, परवेझ पठाणसह ८ जणांची पोलिसांनी काढली धिंड!

Google News Follow

Related

गुजरातमधील खेडा जिल्ह्यात २०२३ पासून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखाली १९ ते २६ वयोगटातील आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती शनिवारी अधिकाऱ्यांनी दिली. ही घटना जिल्ह्यातील एका गावात घडल्याचे त्यांनी सांगितले असून, आणखी एक आरोपी सध्या फरार आहे.

“खेडा टाउन पोलिसांना १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच गावातील नऊ जणांनी २०२३ ते २०२६  दरम्यान सामूहिक बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्याची तक्रार मिळाली,” असे खेडा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक विजय पटेल  यांनी सांगितले. पोलिसांनी तत्काळ भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून आठ आरोपींना अटक केली.

मुख्य आरोपी परवेज खान पठाण (२३) याने पीडितेला फसवून तिच्यावर बलात्कार केला. त्याने या कृत्याचे व्हिडिओ बनवून ते इतर आठ आरोपींना दाखवले. त्यानंतर त्यांनीही दीर्घ कालावधीत आलटून-पालटून तिच्यावर बलात्कार केला, असे पोलिसांनी सांगितले.

शेवटी पीडितेने धैर्य एकवटून आपल्या कुटुंबीयांना सर्व घटना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी खेडा टाउन पोलिस ठाण्यात बलात्कार, सामूहिक बलात्कार, गुन्हेगारी धमकी, गुन्हेगारी कट इत्यादी कलमांखाली तक्रार दाखल केली.

ही आहेत आरोपींची नावे

या प्रकरणात मुख्य आरोपी परवेज पठाणसह माहिर खान पठाण (२४), फैजान खान पठाण (२३), तौफिक खान पठाण (२३), अयान खान पठाण (१९), मोईन खान पठाण (२२), मारूफ खान पठाण (२५) आणि सलमान खान पठाण (२६) यांना अटक करण्यात आली आहे. तर साहिल पठाण हा आणखी एक आरोपी फरार आहे.

कमला, कलाई नदीप्रकल्प: चीननीतीविरुद्ध रणनीती

DRDO कडून पृथ्वी-II साठी तीन वर्षांचा सपोर्ट करार! म्हणजे नेमकं काय?

चेकमेट-समेटचा प्रयोग काँग्रेसमध्ये रिजिम चेंज?

कॉर्पोरेट ऑफिसमध्ये हव्या धर्म-संस्कृतीच्या खाणाखुणा!

पोलिसांच्या मते, आरोपींनी हे कृत्य पूर्वनियोजित पद्धतीने आणि दीर्घ कालावधीत केले. “या प्रकरणातील तथ्यांनुसार, आरोपींनी अल्पवयीन मुलीवर विनाकारण शारीरिक अत्याचार आणि धमक्या दिल्या असून हे कृत्य त्यांनी दीर्घ काळ नियोजनपूर्वक केले आहे,” असे पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे.

प्रकरण गंभीर असल्याने खेडा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत भारतीय न्यायसंहिता आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. आरोपींविरुद्ध जलद कारवाईसाठी स्वतंत्र पोलिस पथके तयार करण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा