29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
घरक्राईमनामाभगवी वस्त्रे परिधान केल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला, शाळेच्या मुख्याध्यापकांवर गुन्हा

भगवी वस्त्रे परिधान केल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला, शाळेच्या मुख्याध्यापकांवर गुन्हा

तेलंगानातील घटना

Google News Follow

Related

विद्यार्थ्यांनी भगवी वस्त्र परिधान करून शाळेत प्रवेश केल्याप्रकरणी शाळेत प्रवेश न दिल्याची घटना तेलंगानामध्ये घडली आहे. काही विद्यार्थ्यांनी ‘हनुमान दीक्षा ड्रेस’ परिधान केल्याबद्दल शिक्षकांनी कथित आक्षेप घेतल्यानंतर एका धार्मिक संघटनेच्या सदस्यांनी तेलंगणातील मंचेरियल जिल्ह्यात निदर्शने केली आणि शाळेची तोडफोड केली. मदर तेरेसा शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला नसल्याचा आरोप आहे. यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तक्रारीनंतर बुधवारी मुख्याध्यापक यांच्याविरुद्ध कलम १५३ (ए) (धर्म किंवा वंशाच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) आणि २९५ (अ) (धार्मिक अपमान) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी तेलंगणातील एका मिशनरी शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी काही मुलांना भगवे कपडे परिधान करून शाळेत येण्यापासून रोखल्याचा आरोप आहे. हैदराबादपासून २५० किमी अंतरावर असलेल्या मंचेरियल जिल्ह्यातील कन्नेपल्ली गावात ही घटना घडली. ब्लेस्ड मदर तेरेसा स्कूल या शाळेत ही घटना घडली.

माहितीनुसार, मंगळवारी काही मुले गणवेशाऐवजी भगवे कपडे घालून आली होती. मुख्याध्यापकांनी या मुलांना भगवे कपडे घालून येण्याचे कारण विचारले. मुलांनी उत्तर दिले की त्यांनी हनुमान दीक्षा घेतली आहे, जी त्यांना २१ दिवस पाळायची आहे. त्यानंतर मुख्याध्यापकांनी त्यांना त्यांच्या पालकांना घेऊन येण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मुख्याध्यापकांनी भगवे कपडे घालून मुलांना शाळेत येण्यापासून रोखल्याचा दावा करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात आणखी दोन संशयित अटकेत

रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर!

२१ राज्यांतील १०२ जागांवरील प्रचार थंडावला!

रवी किशनची पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या महिलेविरुद्ध पत्नी प्रीती शुक्ला यांची तक्रार!

यानंतर जमावाने शाळेवर हल्ला केला. भगवे कपडे घातलेल्या काही लोकांनी शाळेच्या खिडक्यांवर दगडफेक केली. यानंतर मुलांच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मुख्याध्यापक जेमन जोसेफ आणि शाळेतील दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परंतु, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा