26 C
Mumbai
Friday, December 12, 2025
घरक्राईमनामाछत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर वादग्रस्त लिखाण; लेखकांवर दाखल होणार गुन्हा

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर वादग्रस्त लिखाण; लेखकांवर दाखल होणार गुन्हा

पोलिसांच्या मेलला उत्तर न देणाऱ्या मुजोर विकिपीडियावर होणार कारवाई

Google News Follow

Related

ऑनलाइन ज्ञानकोश विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या आक्षेपार्ह मजकुरावरून वाद निर्माण झाला होता. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेत पोलिसांना विकिपीडियाशी संपर्क साधून हा मजकुर काढून टाकण्याची विनंती करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी विकिपीडियाला नोटीस बजावली होती. यावर आता विकिपीडियाकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त लिखाण टाकणाऱ्या लेखकांवर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. समाजात तेढ निर्माण होईल असे लिखाण विकिपीडियावर अपलोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे. विकिपीडियाला चुकीची माहिती हटवण्यासाठी तीन दिवसांचा वेळ देण्यात आला होता मात्र विकिपीडियाकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे आता पोलिसांनी कारवाईचा मार्ग अवलंबवला आहे.

महाराष्ट्र सायबर सेलकडून विकिपीडियावर असलेलेल्या कंटेंटसंदर्भात चार ते पाच लोकांचार गुन्हा दाखल होणार आहे. विकिपीडियावर संभाजी महाराजाबद्दल वादग्रस्त लिखाण करणारे अडचणीत येणार आहेत. सायबर सेलने जवळपास १० ते १५ ईमेल विकिपीडियाला केले होते मात्र, यातील एकाही ईमेलला विकिपीडियाने उत्तर दिलेले नाही. त्यामुळे आता महाराष्ट्र सायबर सेल सबंधित लेखकांवर गुन्हा दाखल करत आहे. कलम ६९ आयटी कायदा आणि कलम ७८ या बाबींचे विकिपीडियाने उल्लंघन केल्याचे सायवर सेलचे म्हणणे आहे.

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कमाल खान याने ट्वीटरवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याची बाब समोर आली होती. विकीपीडियाचा आधार घेत कमाल खानने हे ट्वीट केले होते. मात्र, कमाल खानच्या ट्वीटनंतर सर्वचं स्तरावरून संताप व्यक्त केला आणि टीकेची झोड उठवण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची दखल घेत आक्रमक भूमिका घेतली. तसेच यासंदर्भात विकीपीडियाशी संपर्क साधून वादग्रस्त मजकूर काढण्याचे सायबर विभागाचे आयजी यशस्वी यादव यांना आदेश दिले होते.

हे ही वाचा : 

सिनेटने मंजुरी दिलेले FBI चे भारतीय वंशाचे संचालक काश पटेल कोण आहेत?

एकनाथ शिंदेंच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या दोघांना बुलढाण्यातून अटक

इस्रायलमध्ये बस स्फोटांची मालिका; दोन बसमध्ये आढळली स्फोटके

‘शिवाजी विद्यापीठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामांतराची आंदोलनाद्वारे मागणी

विकिपीडिया, एक सार्वजनिकरित्या संपादित करण्यायोग्य ऑनलाइन विश्वकोश, भारतापासून स्वतंत्रपणे कार्यरत आहे. अनेकजण त्यात लेख योगदान देतात, संपादित करतात आणि त्यांची देखभाल करतात. पण, तथ्यांचे असे विकृतीकरण रोखण्यासाठी आम्ही त्यांना नियम लागू करण्याची विनंती करू शकतो, असे देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा