26 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरक्राईमनामाप्रेयसीला परत मिळविण्यासाठी जिम ट्रेनर कडे 'डेडबॉडी'ची मागणी

प्रेयसीला परत मिळविण्यासाठी जिम ट्रेनर कडे ‘डेडबॉडी’ची मागणी

फसवणूक झाल्यामुळे अखेर जिम ट्रेनर ने भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, , कथित मौलानाचा शोध सुरु

Google News Follow

Related

जुन्या प्रेयसीला मिळविण्यासाठी एका जिम ट्रेनर कडे एका कथित मौलानाने  ‘डेडबॉडी’ (मृत पुरुषाचे शरीर) किंवा ८ बकऱ्याचा बळी मागत कथित मौलानाने  जिम ट्रेनर कडून सुमारे दोन लाख उकळल्याची घटना दादर परिसरात उघडकीस आली आहे. फसवणूक झाल्यामुळे अजदतगमाखेर जिम ट्रेनर ने भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कथित मौलाना याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून या कथित मौलानाचा कसून शोध घेतला जात आहे.

या घटनेतील ३८ वर्षीय जिम ट्रेनर हा दादर परिसरात राहणारा आहे. डिसेंबर २०२२ मध्ये इंस्टाग्राम या सोशल मीडियावर या जिम ट्रेनरला ‘ भविष्यशास्त्र’ हे पेज दिसून आले, या पेजवर एका मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. जिम ट्रेनरने या क्रमांकावर कॉल करून “मला माझ्या भविष्याबाबत जाणून घ्यायचे आहे, तसेच  मला जॉब मिळत नसल्यामुळे माझे लग्न होत नाही,” असे त्याने कॉल करून सांगितले. समोरच्या व्यक्तीने तुझा प्रॉब्लेम ३ दिवसात सोडवतो असे सांगून जिम ट्रेनरची माहिती व त्याच्या प्रेयसीचा मोबाईल क्रमांक घेतला, व १०१ रुपये गुगल पे करण्यास सांगितले. समोरच्या व्यक्तीने सांगितल्या प्रमाणे जिम ट्रेनर याने स्वतःची सर्व माहिती आणि प्रेयसीचा मोबाईल क्रमांक पाठवून १०१ रुपये दक्षिणा म्हणून गुगल पे केली

तब्बल पाच दिवसांनी जिम ट्रेनरला त्याच क्रमांकावरून कॉल आला, व कॉल करणाऱ्याने तुझी समस्या खूप मोठी असून त्यांच्याकडे  दुबई येथून एक मोठे मौलाना आले आहेत, असे सांगून त्यांच्याशी बोलण्यास सांगितले, कथित मौलाना याने जिम ट्रेनरच्या भूतकाळाबाबत काही माहिती दिली व तुझे एका मुलीवर प्रेम होते असे सांगताच जिम ट्रेनरचा कथित मौलानावर विश्वास बसला, मौलानाने त्याला तुला तुझ्या प्रेयसीचा फोन येईल परंतु तू उचलू नको, तुझ्या सर्व समस्या सोडवून देतो असे सांगून त्याच्याकडे पैशाची मागणी केली. जिम ट्रेनरने वेळोवेळी कथित मौलानाने दिलेल्या खात्यावर पैसे  पाठवले.  कथित मौलानाने सांगितल्या प्रमाणे जिम ट्रेनरला प्रेयसीच्या मोबाईलवरून कॉल आला मात्र त्याने तो उचलला नाही, मात्र त्यानंतर त्याने प्रेयसीच्या क्रमांकावरून आलेला कॉल उचलला परंतु प्रेयसीचा आवाज वेगळं वाटल्याने त्याने तो कॉल कट करून त्याने प्रेयसीच्या मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठवला, मात्र तिने त्याला कॉल केला नसल्याचे सांगितले.

त्याच रात्री मौलानाचा त्याला कॉल आला व त्याने प्रेयसीने कॉल केला नसल्याचे  ती म्हणत आहे असे सांगितले असता तुझी  समस्या खूप मोठी आहे, तुझ्या प्रेयसीवर बंदिश टाकली आहे, हि बंदिश काढण्यासाठी पुन्हा पैशांची मागणी केली, ट्रेनर ने ती देखील पूर्ण केली, त्यानंतर पुन्हा मौलानांने कॉल करून प्रेयसीवरील बंदिश काढण्यासाठी एक डेडबॉडीची  (मृत पुरुषाचे शरीर)  गरज आहे, मात्र जिम ट्रेनरने त्यासाठी नकार देताच तुझ्या प्रेयसीचा मृत्यू होईल असे सांगून त्याला घाबरवले पर्याय म्हणून एकाच बळी घ्यावा लागेल  त्यासाठी एका लाख रुपये पाठव असे मौलानाने सांगतिले. मात्र जिम ट्रेनरने हे सर्व इथेच थांबवा मला काहीही करायचे नाही असे सांगितले. फेब्रवारी महिन्यात पुन्हा मौलानाचा कॉल आला व त्याने ८ बकऱ्यांची बळी द्यायची आहे, त्यासाठी ५० हजार रुपयाची मागणी केली, जिम ट्रेनरने त्याला प्रत्यत्तर न देता कॉल बंद केला, काही दिवसांनी पुन्हा कथित मौलानाने कॉल करून ५० हजार रुप्याचे काय झाले अशी विचारणा केली असता आपली फसवणूक होता असल्याचे जिम ट्रेनरच्या लक्षात आले.

हेही वाचा :

रिलायन्स आणि जिओने उभारला ५ अब्ज डॉलरचा परकीय चलन निधी

मारहाण प्रकरणातील महिला गर्भवती नसल्याचा नारायण राणेंचा दावा

मुंबईतील कोरोनाने ओलांडला २०० रुग्णांचा टप्पा

पाकिस्तानचा जीडीपी आणखी आटण्याची भीती

मात्र तोपर्यत त्याने  थोडे थोडे करून २ लाख रुपये कथित मौलानाला पाठवले होते. आपली अजून फसवणूक होऊ नये व यातून बाहेर पडण्यासाठी अखेर त्याने  बुधवारी भोईवाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी कथित मौलाना याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण नुकतेच पोलीस ठाण्यात दाखल झाले असून या गुन्ह्याचा तपास करण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा