उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. एक महिन्यापूर्वी मुलीसोबत छेडछाडीची घटना घडली होती. या प्रकरणी पीडितेच्या कुटुंबाने आरोपी आमिर, सुहेल, शोएब आणि साकिबविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. यामुळे कंटाळून पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
ही घटना मंगळवारी (१७ जून) संध्याकाळी घडली. १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या दोन बहिणींसह घरात एकटी होती. पालक नातेवाईकांना भेटायला गेले होते. बहिणी घराच्या छतावर होत्या आणि पीडितेने खाली येऊन पंख्याला गळफास लावून घेतला. काही वेळा नंतर बहिणींनी हे पहिले आणि कुटुंबाला माहिती दिली. पोलसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह ताब्यात घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ मे रोजी आरोपींनी पीडितेला आईचा अपघात झाल्याचे भासवून बोलावले होते. पीडिता तिथे पोहोचताच त्यांनी तिला जबरदस्तीने ऑटोमध्ये बसवले आणि गोदामात नेऊन तिचा विनयभंग केला. त्यानंतर कुटुंबाने सौम्य कलमांखाली गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा :
जंगलचट्टीजवळ पादचारी मार्गावर डोंगरावरून मोठे खडे कोसळले
भारतीय संरक्षण कंपन्यांचे उत्पन्न १५-१७ टक्क्यांनी वाढेल
इंग्लंड दौरा सिराजसाठी बुमराहसोबत आघाडीचा गोलंदाज होण्याची संधी
श्री मनकामेश्वर मंदिरात ड्रेस कोड लागू
मात्र, आरोपींवर कोणतीही कारवाई झाली नाही. याउलट आरोपींनी कुटुंबाला केस मागे घेण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून अखेर अल्पवयीन मुलीने गळफास घेवून आत्महत्या केली. मुलीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी आरोपी आमिर, सुहेल आणि शोएबला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.







