27 C
Mumbai
Sunday, March 15, 2026
घरक्राईमनामापंजाबमधील आप आमदार विनयभंग प्रकरणी दोषी

पंजाबमधील आप आमदार विनयभंग प्रकरणी दोषी

तरुणीला मारहाण केल्याचा आरोप

Google News Follow

Related

पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या आमदाराच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. खादूर साहिबचे आमदार मनजिंदर सिंग लालपुरा यांना तरनतारनच्या जिल्हा न्यायालयाने मारहाण आणि विनयभंग प्रकरणी दोषी ठरवले आहे. पोलिसांनी आमदारासह सर्वांना ताब्यात घेतले आहे. त्यांना १२ सप्टेंबर रोजी शिक्षा सुनावण्यात येईल.

संबंधित प्रकरण हे २०१३ सालचे आहे. त्यावेळी आमदार लालपुरा हे टॅक्सी चालक होते. तरणतारनच्या उस्मा गावातील एका तरुणीने त्यांच्यावर विनयभंग आणि मारहाणीचा आरोप केला होता. पीडितेने सांगितले की, जेव्हा तिने विरोध केला तेव्हा टॅक्सी चालकांनी तिला बेदम मारहाण केली. मुलीने टॅक्सी चालकांवरही विनयभंगाचा आरोप केला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनीही मुलीला मारहाण केल्याचा आरोप होता, त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आणि कुटुंबाला सुरक्षा देण्याचे आदेश दिले.

हे ही वाचा : 

नेपाळनंतर फ्रान्समध्ये हिंसाचार; २०० हून अधिक लोकांना अटक

प्रशांत कारुळकरांनी इंडिया हाउसला भेट देत सावरकरांच्या स्मृतींना दिला उजाळा

ऑपरेशन सिंदूरमध्ये ‘संभव’ची महत्त्वाची भूमिका; काय आहे संभव मोबाइल?

नेपाळमध्ये हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर २७ जणांना अटक; शस्त्रे जप्त

आरोपी टॅक्सी चालकांपैकी मनजिंदर सिंग लालपुरा हे २०२२ मध्ये खादूर साहिब मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले होते. दरम्यान, आमदार लालपुरा यांच्या वकिलाने सांगितले की, हा एका दलित मुलीवर झालेल्या हल्ल्याचा खटला आहे. निर्णय अजून येणे बाकी असून आम्ही त्याला उच्च न्यायालयात आव्हान देऊ.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा