29 C
Mumbai
Saturday, March 14, 2026
घरक्राईमनामाचक्क तो बेड्यांसह पळाला पण

चक्क तो बेड्यांसह पळाला पण

न्यायालयात हजर करताना आरोपी निसटला

Google News Follow

Related

न्यायालयाच्या आवारातून बेड्यांसह एक आरोपी पळून गेल्याची घटना घडली.

पळून गेलेल्या आरोपीला काही तासांतच भायखळा पोलिसानी नागपाडा येथून अटक केली आहे. मिराज फैय्याज खान (२५) असे अटक आरोपीचे नाव आहे. मिराज याला भायखळा पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती,मंगळवारी त्याला शिवडी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. आरोपीला न्यायालयाच्या बाहेर आणून पोलीस वाहनात बसवत असताना त्याने पोलिसांच्या हाताला झटका देऊन बेड्यासह पळ काढला होता.

भायखळा पोलीस ठाण्याचे पथक त्याच्या मागावर होते, आरोपी मिराज हा नागपाडा येथे लपून बसला असल्याची माहिती मिळताच पोलिसानी नागपाडा कामाठीपुरा ५वी गल्ली येथून अटक केली आहे.

हे ही वाचा:

उद्धव यांचा दसरा मेळावा म्हणजे पवार आणि सोनियांच्या मिश्र विचारांचा

ब्रह्मास्त्र थंड पडत चाललंय

‘पुष्पा’ एसटी झुकलेली, खचलेली

सपा नेत्याने दिली होती सेंट्रल व्हिस्टा बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांनी केली अटक

 

पोलिसांच्या हातावर झटका देऊन पळून गेल्याप्रकरणी भायखळा पोलीसानी त्याच्याविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याची माहिती भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक खोत यांनी दिली.

अशा प्रकारच्या घटना अनेकवेळा घडत असतात. लघवीला जाण्याच्या बहाण्याने पोलिसांना गुंगारा देऊन आरोपी निसटल्याचे प्रकार यापूर्वीही घडलेले आहेत. कधी कधी वैद्यकीय तपासणीसाठी आलेले असताना पोलिसांना चकमा देऊन आरोपी निसटतात.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा