25 C
Mumbai
Wednesday, March 18, 2026
घरक्राईमनामा२१ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद

२१ वर्षांपासून फरार आरोपी अखेर जेरबंद

शेअर फसवणूक प्रकरणात हवा होता

Google News Follow

Related

तब्बल २१ वर्षे पोलिसांना चकवा देणाऱ्या शेअर फसवणूक प्रकरणातील आरोपीला अखेर एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी जेरबंद केले आहे. संतोष हिराचंद जैन (५०, रतलाम- मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला मुंबईलगत मीरा रोड परिसरातून पकडण्यात आले.

ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ देशमाने यांच्या पथकाने केली. २००४ मध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यात चोरी, फसवणूक, बनावटगिरी आणि गुन्हेगारी कट रचणे असे गंभीर आरोप असून, भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४६९, ४७१, १२०(ब) आणि ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला होता.

हे ही वाचा:

भारतीय संस्कृतीच्या आत्म्याला स्पर्श करणारा लेखक

बरेली हिंसाचार: मुख्य कट रचणाऱ्यांपैकी एक नदीम खान पोलिसांच्या ताब्यात!

एकत्र राहण्यास पत्नीचा नकार ; पवईत पतीने वकिल पत्नीची केली हत्या

भारत ते भूतान रेल्वे प्रवास लवकरच! ४,०३३ कोटी रुपयांची गुंतवणूक

फरार आरोपीचा शोध अलीकडेच पुन्हा सुरू करण्यात आला होता. जुन्या नोंदी तपासून आणि नातेवाईक व ओळखीच्या लोकांमार्फत गुप्त माहिती घेतल्यानंतर पोलिसांना जैन अधूनमधून मीरा रोडला व्यवसायासाठी येत असल्याचे समजले. त्यानंतर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत तोच हवा असलेला आरोपी असल्याचे उघड झाले आणि त्याला औपचारिक अटक करण्यात आली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा