29 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरक्राईमनामालुडो गेम खेळण्यातून सहकाऱ्याची हत्या करून आरोपीची आत्महत्या!

लुडो गेम खेळण्यातून सहकाऱ्याची हत्या करून आरोपीची आत्महत्या!

साकिनाका पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल

Google News Follow

साकिनाक्यात लुडो खेळण्यातून झालेल्या वादात एकाने आपल्या सहकाऱ्याची निर्घृण हत्या करून स्वतः गळफास लावून आयुष्य संपवल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे.या प्रकरणी साकिनाका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालय येथे पाठविण्यात आली आहे.

साकिनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुर्ला काजूपाडा पाईप लाईन या ठिकाणी असलेल्या घासवाला कंपाउंड येथे गारमेंट कारखान्यात काम करणाऱ्या दोन कारागिरामध्ये मंगळवारी रात्री लुडो गेम खेळण्यावरून भांडण झाले होते. या भांडणात शीघ्रकोपी असलेल्या आयाज याने सहकारी कारागीर बंगाल सद्दाम हुसेन याच्यावर कैचीने हल्ला केला, आयाज ने बंगालच्या गळ्यात कैची भोसकून त्याची हत्या केली.

हे ही वाचा:

बिहारमध्ये १५ जणांना नेणाऱ्या रिक्षाला अपघात; ९ ठार!

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

दुराव्यानंतर पुन्हा अखिलेश यांचे काँग्रेसशी जुळले!

बाबा सिद्दीकींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची झिशान सिद्दीकीवर कारवाई!

या हत्येनंतर घाबरलेल्या आयाज याने कारखान्यातच गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला, घटनास्थळी दाखल झालेल्या साकिनाका पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालय येथे पाठविले. घटनास्थळी दाखल झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गबाजी चिमटे,पोलीस निरीक्षक साबळे यांनी घटनास्थळाची पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा साकिनाका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती गबाजी चिमटे यांनी दिली.

मृत आरोपी हा रागीट स्वभावाचा होता,त्याला गावाकडील कौटुंबिक कलहतुन तणावात होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन्ही मृत कारागीर रात्री बाहेरून जेवण करून झोपण्यासाठी कारखान्यावर आले होते, त्यानंतर दोघे झोपण्यापूर्वी ‘लुडो गेम’ खेळत असताना दोघांमध्ये भांडण झाले, या भांडणातून आरोपीने कापड कापण्याची कैची घेऊन मयत इसमाच्या गळ्यावर वार केला, सहकारी मृत झाल्याचे बघून घाबरलेल्या आरोपीने स्वतः गळफास लावून आत्महत्या केली अशी प्राथमिक माहिती समोर येत असल्याचे पोलीस निरीक्षक साबळे यांनी दिली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा