30 C
Mumbai
Sunday, September 20, 2026
घरक्राईमनामाअभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर हल्ला

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर हल्ला

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

चोरीच्या उद्देशाने आलेल्या एकाने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांवर चाकूने हल्ला केला आहे. आज (मंगळवारी, दि.२५) सकाळी साडेसातच्या सुमारास निगडी प्राधिकरण याठिकाणी सोनाली कुलकर्णी हिच्या ‘वरलक्ष्मी’ या राहत्या घरी ही घटना घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या सोनाली कुलकर्णी हिच्या वडिलांच्या हाताला टाके पडले आहेत.

या प्रकरणी सोनाली कुलकर्णीचे वडील मनोहर गणपतराव कुलकर्णी (वय ५५, रा. प्राधिकरण, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

हे ही वाचा:

नालेसफाईचा दावा फोल, टक्केवारीच्या कारभाराचे भाजपाकडून पोस्टमार्टम

कोवॅक्सिनला मान्यता देण्याची डब्ल्युएचओला कोवॅक्सची सूचना

शरद पवारांचा नातू म्हणून दुसरा न्याय का?

सहाय्यक पोलिस निरीक्षकाने केला एव्हरेस्ट सर!

‘वरलक्ष्मी’ या बिल्डिंगच्या सुरक्षा रक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी एक चोरटा चाकू, प्लास्टिकची पिस्तुल घेऊन इमारतीच्या आत घुसला. त्यानंतर समोर आलेल्या एका महिलेवर त्याने स्प्रे मारला. त्यानंतर हा चोरटा दुसऱ्या मजल्यावर गेला याठिकाणी सोनाली कुलकर्णी यांचे कुटुंबीय राहतात. सोनाली कुलकर्णीचे वडील व चोर यांच्यात झटापट झाली. यावेळी चोराने त्यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली.

सुरक्षा रक्षकाने तात्काळ शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक अमित गावडे यांना फोन करून घडलेली हकीकत सांगितली. नगरसेवक अमित गावडे यांनी पोलिसांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतले.

निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेल्या चोरट्याचे नाव अजय विष्णू शेट्टे (वय २४, रा. बीड)  आहे. आपल्या मागे पोलीस लागले होते म्हणून घाबरून पळत होतो, असे त्या चोरट्याने पोलिसांना सांगितले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा