29 C
Mumbai
Saturday, July 24, 2021
घरक्राईमनामाआजतककडून अभिनेता उमेश कामतची बदनामी

आजतककडून अभिनेता उमेश कामतची बदनामी

Related

गेल्या काही दिवसांपासून राज कुंद्रा चर्चेचा विषय ठरला आहे. ब्रिटनमध्ये असलेल्या पार्टनरसोबत पॉर्न फिल्म शूट केल्याप्रकरणी सध्या राज कुंद्रा पोलीस कोठडीत आहे. त्याला २३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फेब्रुवारीपासून हे प्रकरण चालू आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यात राज कुंद्रासह आणखीही काही लोकांची नावं आली त्यात एक नाव होतं उमेश कामत. परंतु आजतक या आघाडीच्या हिंदी वृत्त वाहिनीने मराठी अभिनेता उमेश कामत याचा फोटो लावला होता.

राज कुंद्रा प्रकरणात आरोपी असलेल्या उमेश कामतच्या नावावरून आता हिंदी वाहिन्यांनी मराठी अभिनेता उमेश कामत याचा फोटो बातम्यांवेळी लावायला सुरूवात केली आहे. उमेश कामतनेच फेसबुकद्वारे ही माहिती दिली. आजतक या आघाडीच्या हिंदी वृत्त वाहिनीने राज कुंद्रा आणि त्याचा भागीदार उमेश कामत यांच्यातलं संभाषण दाखवताना मराठी अभिनेता उमेश कामत याचा फोटो दाखवायला सुरूवात केली. याचा नाहक त्रास आपल्या उमेशला झाला.

आपल्या सर्वांनाच अभिनेता उमेश कामत परिचित आहे. त्याने आजवर अनेक उत्तम सिनेमे, नाटकं आणि मालिका केल्या आहेत. सध्या ‘अजूनही बरसात आहे’ ही त्याची मालिका टीव्हीवर सुरु आहे. गुगलवर उमेश कामत असं नाव टाईप केल्यानंतर अभिनेता उमेशचे अनेक फोटो येतात. त्यामुळे नामसाधर्म्यामुळे हा गोंधळ झाला हे जरी मान्य असलं तरी माध्यमांनी फोटो देताना खातरजमा करायला हवी, असं उमेशला वाटतं.

हे ही वाचा:

चीनमध्ये १०० वर्षातला सर्वाधिक पाऊस, लाखो लोकांना केलं स्थलांतरित

चीनमध्ये पुरामुळे २५ पेक्षा जास्त मृत्यू

आमच्यावर किमान ‘ही’ वेळ आलेली नाही, येणारही नाही

मालपेकर यांची सोनसाखळी हिसकावणारा अटकेत

उमेश कामतने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये या प्रकाराचा जाहीर निषेध केला आहे. त्याने त्याचा फोटो टीव्हीवर दाखवला जात असतानाचे स्क्रीन शॉट्सही टाकले आहेत. शिवाय, या प्रकाराने जी नाहक बदनामी आपली झाली आहे, त्याबद्दल आपण कायदेशीर कारवाई करू असा इशाराही उमेशने या फेसबुक पोस्टमध्ये दिला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,288अनुयायीअनुकरण करा
1,990सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा