32 C
Mumbai
Thursday, December 11, 2025
घरक्राईमनामाबॉलीवूड अभिनेत्री आलिया भटची ७७ लाखांनी फसवणूक

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भटची ७७ लाखांनी फसवणूक

माजी पर्सनल असिस्टंटला बंगळुरू येथून अटक

Google News Follow

Related

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भटची माजी पर्सनल असिस्टंट वेदिका प्रकाश शेट्टी हिला जुहू पोलिसांनी बंगळुरूहून अटक केली आहे.

वेदिकावर आलियाची प्रोडक्शन कंपनी इटरनल सनशाइन प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि तिच्या पर्सनल अकाऊंटमधून तब्बल ७६,९०,८९२ चा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप आहे.

मे २०२२ ते ऑगस्ट २०२४ दरम्यान ही फसवणूक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, आलियाची आई आणि प्रोडक्शन हाऊसच्या संचालक सोनी राजदान यांनी २३ जानेवारी २०२५ रोजी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तेव्हा हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदिका शेट्टीने २०२१ मध्ये आलिया भटची पर्सनल असिस्टंट म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि २०२४ पर्यंत या पदावर राहिली. या काळात तिला आर्थिक व्यवहारांशी संबंधित अनेक अधिकार देण्यात आले होते. पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की, वेदिकाने बनावट बिलं बनवली आणि आलियाला त्यावर स्वाक्षरी करायला लावली.

हे ही वाचा:

छांगुर बाबा प्रकरणात ईडीकडून तपास

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती लुला यांच्यात व्यापार व गुंतवणुकीवर चर्चा

चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश एकत्र येणे धोकादायक – सीडीएस अनिल चौहान

Apple COO Sabih Khan : सबीह खान कोण आहे ?

हे खर्च आलियाच्या प्रवास, मीटिंग्स आणि इतर कार्यक्रमांशी संबंधित आहेत असं खोटं सांगून ती अभिनेत्रीची सतत दिशाभूल करायची. तिने ऑनलाईन टूल्सचा वापर करून प्रोफेशनलपणे ही बिलं डिझाईन केली, जेणेकरून ती खरी वाटतील. आलियाने या बिलांवर स्वाक्षरी केल्यानंतर, संबंधित रक्कम एका जवळच्या मित्राच्या खात्यात ट्रान्सफर केली जायची.

मित्र नंतर सर्व पैसे वेदिकाला परत करायचा. पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर, वेदिका शेट्टी फरार झाली आणि सतत तिचं लोकेशन बदलत राहिली. ती सर्वात आधी राजस्थान, नंतर कर्नाटकमध्ये, नंतर पुणे आणि शेवटी बंगळुरूला पोहोचली. जुहू पोलीस पथकाने तिला बंगळुरूहून तिला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा