26 C
Mumbai
Sunday, February 15, 2026
घरक्राईमनामामुंबईत ३६ तासांत १२ मुले गायब असल्याचे वृत्त पोलिसांनी फेटाळले

मुंबईत ३६ तासांत १२ मुले गायब असल्याचे वृत्त पोलिसांनी फेटाळले

बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी मुंबईभर व्यापक मोहीम

Google News Follow

Related

भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत अल्पवयीन मुलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचले असून, गेल्या अवघ्या ३६ तासांत शहरातील सात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून १२ अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या आकडेवारीनुसार यामध्ये आठ मुलींचाही समावेश असून, या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र मुंबई पोलिसांनी ही माहिती अफवा असल्याचे सांगत हे वृत्त फेटाळले आहे.

पालकांनी दाखल केलेल्या तक्रारींच्या आधारे मुंबई पोलिसांनी अपहरणाच्या संशयावरून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३७(२) अंतर्गत १२ अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत, असे कळते. बेपत्ता होण्यामागे संघटित बाल तस्करीचे जाळे सक्रिय असल्याचा संशय पोलिस व बाल हक्क कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई पोलिसांनी कुटुंबियांना मुलांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. काही प्रकरणांमध्ये कौटुंबिक वाद किंवा घरातून पळून जाणे ही कारणे असू शकतात, मात्र सातत्याने वाढणारी आकडेवारी आणि काही विशिष्ट परिसरांतील पुनरावृत्ती संशय अधिक गडद करत आहे.

दरम्यान, पोलिसांनी एक्सवर पोस्ट करत यासंदर्भातील स्पष्टीकरण दिले आहे. मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की, काही समाज माध्यम खात्यांद्वारे बेपत्ता आणि अपहरण झालेल्या मुलांबाबत चुकीची माहिती व अफवा पसरवली जात आहे. आम्ही या दाव्यांचे पूर्णपणे खंडन करतो. या संदर्भात मुद्दाम खोटी माहिती पसरवून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे (FIR) नोंदवण्यासह कठोर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हे ही वाचा:

‘क्रिटिकल मिनरल्स’ परिषदेसाठी एस जयशंकर अमेरिकेला रवाना

कोलकात्यातील रेस्तराँकडून गोमांस दिल्याची कबुली, मागितली माफी

१४६ प्रकाशवर्षे अंतरावर सापडला राहण्यायोग्य ग्रह!

AI सेमीकंडक्टरचा शंखनाद!

मुंबई पोलिसांच्या नोंदीनुसार, जून ते डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण १४५ मुले बेपत्ता झाली असून, त्यापैकी ९३ मुली आहेत. नोव्हेंबर ते डिसेंबरदरम्यानच ८२ प्रकरणांची नोंद झाली होती. यामध्ये बहुसंख्य किशोरवयीन मुलांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा