27 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरक्राईमनामारांचीमधील ‘त्या’ जीर्ण इमारतीत इसिसचा दहशतवादी बनवत होता बॉम्ब आणि ...

रांचीमधील ‘त्या’ जीर्ण इमारतीत इसिसचा दहशतवादी बनवत होता बॉम्ब आणि …

दहशतवादी कारवायांचा कट उधळला

Google News Follow

Related

रांचीच्या इस्लामनगर परिसरात एका कोपऱ्यात तबरक लॉज असून बाहेरून पाहणाऱ्याला हे एक हॉटेल असल्याचे वाटते. पण, प्रत्यक्षात आतमध्ये ही एक जीर्ण झालेली इमारत असून आत लहान आणि अरुंद खोल्या आहेत. या जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये दडलेले एक धक्कादायक सत्य समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

तबरक लॉजममध्ये खोली क्रमांक १५ मधून काही धक्कादायक गोष्टी सापडल्या असून कारवाईत दहशतवाद्यांचा कट उधळला गेला आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये नियुक्तीसाठी स्पर्धात्मक एसएससी परीक्षेचा अभ्यास करणारा तरुण अशर दानिश हा बॉम्ब बनवत असल्याचे उघडकीस आले आहे. अभ्यासाच्या नावाखाली हा तरुण आयसिस दहशतवादी गटासाठी बॉम्ब बनवत होता. ‘एनडीटीव्ही’ने या संदर्भात वृत्त दिले आहे.

गेल्या आठवड्यात दिल्ली पोलिसांनी दहशतवादी आफताब कुरेशीला अटक करून त्याची चौकशी केल्यानंतर, या जीर्ण इमारतीमधील सत्य बाहेर आले आहे. आफताबने पुरवलेल्या माहितीच्या आधारे आणि या छाप्यांमध्ये सापडलेल्या माहितीच्या आधारे, दिल्ली आणि झारखंडच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनी दानिश आणि इतर जणांना शोधून काढण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी संयुक्त मोहीम राबवली. या कारवाईमुळे बॉम्ब बनवणे, इसिससाठी तरुणांची भरती करणे आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करण्याच्या योजना आखण्यात गुंतलेल्या दहशतवादी गटाच्या कारवायांना आळा बसला आहे.

दानिशच्या खोलीतून गनपावडर आणि बॉम्ब, तसेच मोठ्या प्रमाणात पोटॅशियम नायट्रेट आणि घरगुती शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या खोलीत स्फोटके बनवण्यात आली होती आणि नंतर सुवर्णरेखा नदीच्या पाण्यात त्यांचा स्फोट करून त्यांची चाचणी करण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. पोटॅशियम नायट्रेट, ज्याला सॉल्टपीटर देखील म्हणतात, हे एक रासायनिक संयुग आहे जे खतांमध्ये देखील आढळते आणि गनपावडर बनवण्यासाठी वापरले जाते. श्वासाद्वारे शरीरात गेल्यास हानिकारक ठरू शकते. तसेच खोलीतून विविध आकाराची आणि तीव्रतेची स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.

हेही वाचा..

काँग्रेसकडून परिवारवादाला संविधानापेक्षा वरचे स्थान

उद्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण

लंडनच्या हीथ्रो, ब्रुसेल्ससह प्रमुख युरोपियन विमानतळांवर सायबर हल्ला; असंख्य उड्डाणे रद्द

‘एनसीडी’ आजाराबद्दल हे माहित आहे का ?

जीर्ण इमारतीची खोली क्रमांक १५ ही केवळ बॉम्ब कारखाना नव्हती तर ती एक भरती केंद्र देखील होती. गेल्या वर्षी दानिश येथे स्थलांतरित झाला होता, दानिशला स्वतः सोशल मीडियाद्वारे काम करणाऱ्या एका पाकिस्तानी हँडलरने भरती केले होते आणि कट्टरपंथी बनवले होते, त्यानंतर त्यानेही लोकांना भरती करण्यास सुरुवात केली. यातील बहुतेक भरती आणि कट्टरतावाद सिग्नल मेसेजिंगद्वारे केला जात होता. अमेझॉनवरून चाकू आणि रसायने मागवण्यात आली होती. दानिशच्या पाकिस्तानी हँडलरने त्याला पेंटेरिथ्रिटॉल टेट्रानायट्रेट बॉम्बसह स्फोटके कशी बनवायची हे शिकवले होते. या मॉड्यूलमधील इतर सदस्यांची ओळख सुफियान खान, मोहम्मद हुजैफ यमन आणि कामरान कामरान कुरेशी अशी झाली आहे, ज्यांची धार्मिक स्थळांवर हल्ला करण्याची योजना होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा