29 C
Mumbai
Sunday, October 4, 2026
घरक्राईमनामा...आणि त्याने छाटली भावाचीच बोटे!

…आणि त्याने छाटली भावाचीच बोटे!

Google News Follow

Related

संपत्तीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावावर तलवारीने वार एका हाताची दोन बोटे छाटल्याची धक्कादायक घटना गोवंडी परिसरातील देवनार येथे घडली आहे. देवनार पोलिसांनी याप्रकरणी लहान भावसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून लहान भावाला अटक करण्यात आली आहे.

सलीम गफूर शेख (३८) असे जखमी भावाचे नाव आहे. सलीम गफूर हा गोवंडी केना मार्केट परिसरात पत्नी निलोफर आणि दोन मुलांसह राहण्यास आहे. त्याच परिसरात त्याचा लहान भाऊ जावेद गफूर शेख (३५) हा राहण्यास आहे. दोन्ही भावांमध्ये संपत्तीचा वाद असून शनिवारी रात्री जावेद हा शेजारीच असलेल्या भावाच्या सासुरवाडीत जाऊन दाराला लाथ मारून धमकी देऊ लागला.

हे ही वाचा:

युद्धात पाकिस्तानवर शौर्य गाजवणारा ‘वैजयंता’ सापडला रेतीबंदरच्या कचऱ्यात

धर्मांतरण करणारा अतिफ उर्फ कुणाल चौधरी उत्तर प्रदेश एटीएसला सापडला नाशिकमध्ये

सर्वोच्च उंचीवरच्या संस्थेला मिळाले लाय- फायचे हाय-फाय नेटवर्क!

‘लिफ्ट करा दे’ च्या नादात अखिलेश यांची पोलखोल

 

हा प्रकार भाऊ सलीम आणि भावजयी निलोफर याला समजताच दोघे त्याला समजवण्यासाठी गेले असता जावेद आणि त्याच्यासोबत असलेल्या एकाने सलीम आणि निलोफर यांच्यावर तलवारीने हल्ला केला. सलीम याने तलवारीचा वार हातावर झेलला असता त्यात त्याच्या हाताची दोन बोटे छाटली गेली. जावेद याला पकडण्यासाठी शेजाऱ्यांनी प्रयत्न केला असता त्याने लोकांना तलवारीचा धाक दाखवत तेथून पळ काढला. जखमी सलीम याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून देवनार पोलिसानी जावेद आणि त्याच्या मित्रांवर गुन्हा दाखल करून जावेदला अटक केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा