28 C
Mumbai
Sunday, March 15, 2026
घरक्राईमनामाजम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला, ३ जवान जखमी!

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला, ३ जवान जखमी!

राजौरी-ठाणमंडी-सुरनकोट मार्गावरील सावनी परिसरात घडली घटना

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरच्या पुंछमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केल्याने किमान तीन जवान जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.राजौरी-ठाणमंडी-सुरनकोट मार्गावरील सावनी परिसरात दुपारी साडेतीनच्या सुमारास लष्कराच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला.

दहशतवाद्यांनी ट्रक आणि जिप्सीसह पोलिसांच्या वाहनांवर गोळीबार केला.बुफलियाज जवळील भागात बुधवार रात्री पासून दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरु आहे.पुंछच्या सुरनकोट भागातील डेरा की गली, ज्याला डीकेजी म्हणूनही ओळखले जाते, येथून भारतीय जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला.दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दलाची अतिरिक्त कुमक घटनास्थळी पाठवण्यात आल्याची माहिती आहे. तसेच जखमी झालेल्या जवानांकरिता रुग्णवाहिका देखील पाठवण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

भावाला किडनी दिली म्हणून दिला तिहेरी तलाक!

कुस्ती फेडरेशनच्या निवडणुकीनंतर साक्षी मलिक, विनेश फोगटचा कुस्तीला रामराम!

लोकसभेतून आणखी तीन विरोधी खासदार निलंबित!

उत्तर प्रदेशात वर्गमित्रांनी दहावीच्या विद्यार्थ्याला विवस्त्र करून केली मारहाण!

या संदर्भात संरक्षण प्रवक्त्याने सांगितले की, काल रात्री एक संयुक्त ऑपरेशन सुरू करण्यात आले.त्यानंतर चकमकीला सुरुवात झाली.अधिक तपशीलांची खात्री केली जात आहे, असे संरक्षण प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात बुधवारी सशस्त्र पोलिस युनिटच्या कंपाऊंडमध्ये स्फोट झाल्यानंतर ही घटना घडली.सुरनकोट भागात १९ आणि २० डिसेंबरच्या मध्यरात्री झालेल्या स्फोटामुळे कंपाऊंडजवळ उभ्या असलेल्या काही वाहनांच्या खिडक्यांचे नुकसान झाले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

 

 

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा