27 C
Mumbai
Thursday, December 9, 2021
घरक्राईमनामाआर्यन खान आणि अनन्या पांडेचे व्हॉट्सऍप चॅट आले समोर!

आर्यन खान आणि अनन्या पांडेचे व्हॉट्सऍप चॅट आले समोर!

Related

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या व्हॉट्सऍप चॅटमधून आता नवा खुलासा झाला आहे. या चॅटमध्ये एनसीबीच्या नावाने आर्यनने मित्रांना धमकावले आहे. आर्यन खानने ८० हजार रुपये किमतीचा गांजा अचित कुमार नावाच्या अमली पदार्थ तस्कराकडून विकत घेतल्याचा उल्लेख केला आहे.

एनसीबीच्या म्हणण्यानुसार, आर्यन- अनन्या संभाषणाव्यतिरिक्त आर्यनच्या मित्रांचा एक व्हॉट्सऍप ग्रुप आहे, जो फक्त ड्रग्सबद्दल बोलण्यासाठी तयार करण्यात आला होता. या ग्रुपमध्ये आणखी अनेक स्टार किड्सचा समावेश आहे. एजन्सी लवकरच या ग्रुपतील इतर लोकांना चौकशीसाठी कॉल करू शकते, असे वृत्त ‘टीव्ही ९’ने दिले आहे.

पहिले संभाषण, तारीख- ०६/०७/२०१९

या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अनन्या आणि आर्यन ड्रग्सबद्दल बोलत आहेत.

आर्यन – वीड

अनन्या – इट्स इन डिमांड

आर्यन – मी तुझ्याकडून गुपचूप घेईन.

अनन्या – ठीक आहे

दुसरे संभाषण,  तारीख– ०६/०७/२०१९

हे त्याच दिवशीचे संभाषण आहे जिथे अनन्या आर्यनला लिहिते, ‘आता मी बिझनेसमध्ये आहे’ याचा अर्थ असा की, आता तिच्याकडे ड्रग्ज उपलब्ध आहेत.

अनन्या – आता मी बिझनेसमध्ये आहे

आर्यन – तू गांजा घेतलास?

आर्यन- अनन्या?

अनन्या – मला लवकर मिळेल.

हे ही वाचा:

‘भारतीय मुसलमानांनाही हवा होता पाकिस्तानचा विजय’…मंत्र्याने तोडले तारे

पाकिस्तान जिंकल्याच्या जल्लोषात शिक्षिकेने गमावली नोकरी!

‘जनाब राऊत तुम्हाला नवाब मलिकांच्या नजरेतूनच हिंदूस्थान पाहायचाय’

प्रभाकर साईलने सादर केले खोटे प्रतिज्ञापत्र?

तिसरे संभाषण, तारीख– १८/०४/२०२१

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, ही चॅट आर्यन खानचा एक कथित व्हॉट्सअॅप ड्रग ग्रुपची आहे, जिथे आर्यन त्याच्या दोन मित्रांना ‘चला कोकेन करू’ असे सांगत आहे. यानंतर तो म्हणतो की, आय एम गेटिंग यू फक्ड बाय एनसीबी’ आणि एजन्सीची खिल्लीही उडवतो.

आर्यन – उद्या कोकेन घेऊ.

आर्यन – I am getting you guys fucked.

आर्यन – By NCB

आर्यन खानबरोबर अनन्याचे ड्रग्जसंबंधी मोबाईलवरील व्हॉट्स अ‍ॅपवर चॅटचे पुरावे एनसीबीकडे आहेत. यातूनच अनन्याची चौकशी एनसीबी करीत आहे. गुरुवारी एनसीबीने अनन्याच्या वांद्रे इथल्या घरावर छापेमारी करीत तिचा मोबाईल व लॅपटॉप जप्त केला होता. त्यानंतर तिची मुंबई एनसीबी ऑफिसमध्ये चौकशी करण्यात आली होती. क्रुझ रेव्ह पार्टी प्रकरणात आर्यन खान सध्या आर्थर रोड कारागृहात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,516अनुयायीअनुकरण करा
4,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा