30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरक्राईमनामापार्टीची शोभा वाढविण्यासाठी बोलावण्यात आल्याचा आर्यन खानचा दावा

पार्टीची शोभा वाढविण्यासाठी बोलावण्यात आल्याचा आर्यन खानचा दावा

Google News Follow

Related

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचा आणखी रिमांड मिळावा यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) न्यायालयात मागणी केली आहे. पण आर्यन खानच्या वकिलांच्या वतीने अशा कस्टडीची गरज नसल्याचे ठासून सांगितले जात आहे. सतीश मानेशिंदे यांनी आर्यन खानच्या वतीने युक्तिवाद केला आहे की, फक्त समोरासमोर चौकशी करण्यासाठी रिमांडची मागणी करणं योग्य नाही. आर्यनला पार्टीची शोभा वाढविण्यासाठी बोलावण्यात आले होते, असा दावाही यावेळी करण्यात आला आहे.

युक्तिवाद सुरू असताना दोन्ही बाजूंनी घटनाक्रम सांगितला जात होता. एनसीबीचे वकील अनिल सिंग म्हणतात की, आम्हाला ८ आरोपींची समोरासमोर चौकशी करायची आहे. आर्यन खान याच्यासहित इतर आरोपींना ११ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी हवी आहे. या प्रकरणात षडयंत्र आहे.

सतीश मानेशिंदे म्हणतात की, आर्यनला प्रतिक गाबा नावाच्या मित्राने क्रूझवर बोलावलं होतं. पार्टीची शोभा वाढवून त्याला ग्लॅमर देण्यासाठी त्याला निमंत्रण देण्यात आले होते. त्याला व्हीआयपी सूट देण्यात येईल असंही कळवण्यात आलं होतं. प्रतीकसोबत त्याचे व्हाट्सएप चॅट आहेत त्यात रेव्ह पार्टीचा उल्लेख नाही. त्याला निमंत्रण होत म्हणून तो गेला होता. शिवाय तो अरबाझलाही ओळखतो म्हणून त्याने त्यालाही बोलावलं होतं. आर्यन आणि अरबाझ एकत्र गेले नव्हते.

मानेशिंदे म्हणाले की, आर्यन आणि अरबाझ फक्त एकत्र आतमध्ये प्रवेश करत होते. त्यावेळी एनसीबीचे अधिकारी अचानक आले आणि त्यांनी बॅग शोधायला सुरुवात केली. त्यांना काहीही सापडलं नाही. त्यांनी आर्यनचा मोबाईल घेतला. ते त्याला कधीही आचित सोबत समोरासमोर बसवून चौकशी करू शकतात. माझे व्हाट्सएप चॅट त्यांच्याकडे आहेत. शिवाय, तो अरबाझसोबत माझी मैत्री नाकारत नाहीये पण त्याचा याच्याशी संबंध नाही. मानेशिंदे म्हणाले की, आर्यनला कस्टडीची गरज नाही. माझ्या ३९ वर्षांच्या कारकीर्दीत एकाच आरोपीला कोर्टात आणताना मी पाहिलेलं नाही. ज्या प्रामाणिक अधिकाऱ्याने रिमांड अप्लिकेशन बनवलय त्याच मी कौतुक करतो.

 

हे ही वाचा:

देशात लवकरच ४ हजार नवे ऑक्सिजन प्लँट्स

भारतीय अर्थव्यवस्था किती टक्क्याने वाढणार? वाचा सविस्तर…

सर्वोच्च न्यायालयाच्या ‘या’ निर्णयामुळे विद्युत क्षेत्राला मिळणार ऊर्जा

जगातील पहिल्या मलेरियाच्या लसीला मान्यता

 

मूनमून धमेचाच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, त्यावेळी जप्त केलेल्या ड्रग्सच्या व्यतिरिक्त अजून काहीही जास्त आढळलेलं नाही. मूनमूनकडून काहीही सापडलं नाही तरीही ते तिची कोठडी का मागत आहेत. मूनमून ही आर्यन आणि अरबाझला ओळखत नाही. फक्त क्रूझवर होतो म्हणून ही कारवाई कशाला? मग क्रूझवर असणाऱ्या १३०० लोकांना अटक व्हायला हवी. अरबाझ मर्चंटचे वकील तारक सय्यद म्हणाले की, पाच मिनिटे युक्तिवाद करण्याची परवानगी त्यांनी मागितली. तिच्याकडे ६ ग्रॅम चरस सापडले त्याचा तपास करण्यासाठी एवढ्या दिवसांची कस्टडी लागते का ?

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा