ठाणे वाहतूक पोलीस विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ यांना भरधाव रिक्षाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. शिरसाठ यांना तात्काळ नजीकच्या खाजगी रुगणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेप्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात रिक्षा चालकाविरुद्ध हत्येचा प्रयत्न,निष्काळजीपणे वाहन चालवने तसेच मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे.
ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ हे शुक्रवारी सकाळी ठाणे-घोडबंदर रोडवर वाहतूक व्यवस्थापन करत असताना एका भरधाव वेगात असलेल्या ऑटो रिक्षाने त्यांना धडक दिली. या धडकेत शिरसाठ यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली.
हे ही वाचा:
कानिफनाथ मंदिर, सारसबाग…नमाज, मजारमधून हिंदू संस्कृतीवर घाला
शनी शिंगणापूर देवस्थानातून ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांची हकालपट्टी!
…असा वाचला विश्वासकुमार रमेश, एक थरारक कथा!
शिरसाठ यांना तात्काळ वर्तक नगर येथील खाजगी रुगणालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी चितळसर पोलिसांनी रिक्षा चालकाविरुद्ध हत्येचा प्रयत्न, निष्काळजीपणे वाहन चालवणे तसेच मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे.
