स्फोटकांचा साठा परत घेण्यासाठी आला आणि अचानक स्फोट झाला!

अमृतसरमधील घटना, दुर्घटनेत बब्बर खालसाच्या सदस्याचा मृत्यू 

स्फोटकांचा साठा परत घेण्यासाठी आला आणि अचानक स्फोट झाला!

अमृतसर बायपासवर एक बॉम्ब स्फोटाची घटना घडली आहे. या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेला व्यक्ती हा बब्बर खालसाचा सदस्य असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी घबराट पसरली आहे. घटनास्थळाचे व्हिडीओ फुटेज देखील समोर आले आहेत.

अमृतसर ग्रामीण जिल्ह्यातील कांबो पोलिस स्टेशन हद्दीतील नौशेरा गावाजवळ हा स्फोट झाला. पोलिस अधिकारी काही वेळातच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिसराला वेढा घातला. मुख्य रस्त्यालगत असलेल्या परिसरातून धुराचे लोट येत असल्याचे दृश्यांमध्ये दिसून आले. ही घटना मोठ्या कटाचा भाग होती की वेगळी घटना होती याचा तपास पोलीस करत आहेत.

अमृतसर ग्रामीण पोलिस अधिकारी मनिंदर सिंग यांनी एएनआयला सांगितले की, सकाळी झालेल्या या स्फोटात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. मात्र, त्याचा आता मृत्यू झाला आहे. हा व्यक्ती एका दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे, जो स्फोटकांचा साठा परत घेण्यासाठी आला होता. मागील अशा अनेक प्रकरणांच्या तपासात शेवटी हेच समोर आले आहे कि, हे लोक एका ठिकाणी स्फोटके लपवून ठेवतात आणि त्यानंतर दुसरा कोणीतरी ते गोळा करतो आणि पुढील कृत्य करतो. हे प्रकरण देखील तसेच होते.

हे ही वाचा : 

नकल करने के लिए अकल चाहिये!

१२ वर्षांपासून दिल्लीत राहणाऱ्या चार घुसखोर बांगलादेशींना अटक!

बांगलादेशचा पूर्व पाकिस्तान होणार नाही ना ?

अमित शाह म्हणाले: “बाळासाहेब ठाकरे असते तर ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले असते”

ते पुढे म्हणाले, आम्हाला बरेच संकेत मिळाले आहेत. पुढील तपास सुरू आहे. बब्बर खालसा आणि आयएसआय पंजाबमध्ये सक्रिय आहे आणि बहुधा तो बब्बर खालसाचा सदस्य असावा. तपासानंतर पुढील माहिती देण्यात येईल.

 

Exit mobile version