दिल्लीच्या दक्षिण पश्चिम जिल्ह्यातील अँटी ऑटो थेफ्ट स्क्वॉड (AATS) पथकाने मोठी कारवाई करत चार बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना अटक केली आहे. यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, अटक केलेले हे घुसखोर तब्बल १२ वर्षांपासून भारतात बेकायदेशीरपणे राहत होते. या चौघांकडून बांगलादेशी ओळखपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. एएटीएस टीमला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत या सर्वांना पकडण्यात आले.
मोहम्मद असद अली (४४ ), पत्नी नसीमा बेगम (४० ), मुलगा मोहम्मद नईम खान (१८) आणि मुलगी आशा मोनी (१३) अशी अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोरांची नावे आहेत. हे सर्व फारुख बाजार अजवतारी, पो. गोंगारहाट, फुलबारी कुरीग्राम, बांगलादेशचे रहिवासी आहेत.
हे सर्व भारतात कसे शिरले आणि या १२ वर्षात ते कोणत्या कारवायांमध्ये सहभागी होते याचा तपास पोलीस आता करत आहेत. तसेच, त्यांचा कोणत्या गुन्हेगारी टोळीशी संबंध आहे का किंवा ते इतर कोणत्याही बेकायदेशीर कामात सहभागी होते का, हे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हे ही वाचा :
बांगलादेशचा पूर्व पाकिस्तान होणार नाही ना ?
तांबेच बोलले राहुल गांधींबद्दलचं ‘सत्य’…
अमित शाह म्हणाले: “बाळासाहेब ठाकरे असते तर ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले असते”
सुख चैन कि रोटी खाओ…वरना मेरी गोली तो है ही!
दरम्यान, यापूर्वी, दिल्ली पोलिसांनी हरियाणातील मेवात येथील एका वीटभट्टीवर काम करणाऱ्या ९ बांगलादेशी नागरिकांच्या कुटुंबाला अटक केली होती, जे बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्यानंतर अटकेच्या भीतीने फरार झाले होते. बेकायदेशीर बांगलादेशींबद्दल मिळालेल्या माहितीवरून, पोलिस पथकाने २३ मे रोजी वझीरपूर जेजे कॉलनीमध्ये मोहीम राबवली, ज्यामध्ये एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.
त्याची चौकशी केली असता त्याच्या कुटुंबात एकूण आठ जण असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्या सर्व बांगलादेशी नागरिकांना अटक केली. त्यांच्याकडून एक स्मार्टफोन जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान, कुटुंबाने सांगितले की ते पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यातील भारत-बांगलादेश सीमेवरून बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केले होते.
