एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानच्या लष्करावर जोरदार टीका केली आहे. पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना दिलेल्या फोटोची त्यांनी खिल्ली उडवली आहे. खासदार असदुद्दीन ओवैसी पाकवर टीका करताना म्हणाले, नकल करने के लिए अकल चाहिये, लेकीन इंके पास वो भी नही है.
प्रकरण असे आहे की, पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना एक छायाचित्र सादर केले होते आणि दावा केला होता की हा फोटो भारताविरुद्ध पाकिस्तानच्या लष्करी कारवाईचा एक भाग आहे. मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे उघड झाले. तो फोटो २०१९ मध्ये चिनी सैन्याच्या लष्करी सरावाचा निघाला.
यावरून असदुद्दीन ओवैसी यांनी पाकवर निशाना साधला. कुवेतमधील अनिवासी भारतीयांशी संवाद साधताना ते म्हणाले, काल, पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी पाकिस्तानी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांना एक फोटो भेट दिला. हे मूर्ख विनोदी लोक भारताशी स्पर्धा करू इच्छितात. त्यांनी २०१९ च्या चिनी लष्कराच्या कवायतीचा फोटो दिला आणि तो भारतावरील विजय असल्याचा दावा केला.
ते पुढे म्हणाले, ‘नकल करने के लिए अकल चाहिये लेकीन इंके पास अकल भी नहीं है’ (कॉपी करायला मेंदू लागतो, पण त्यांच्याकडे तोही नाही). पाकिस्तानच्या प्रचाराला बळी पडू नका असा इशारा ओवैसी यांनी दिला आणि म्हणाले, ‘पाकिस्तान जे काही म्हणत आहे त्यातले चिमूटभरही घेऊ नका.’
हे ही वाचा :
१२ वर्षांपासून दिल्लीत राहणाऱ्या चार घुसखोर बांगलादेशींना अटक!
बांगलादेशचा पूर्व पाकिस्तान होणार नाही ना ?
अमित शाह म्हणाले: “बाळासाहेब ठाकरे असते तर ऑपरेशन सिंदूरचे कौतुक केले असते”
हे सामर्थ्य भिकेत मिळत नाही ना चीनकडून, ना अमेरिकेकडून!
दरम्यान, लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी पंतप्रधान शेहबाज शरीफ यांना दिलेला फोटो हा चिनी लष्करी सरावाचा जुना फोटो असल्याचे समोर आले आहे. हा फोटो जुना असून तो गेल्या पाच वर्षांत असंख्य वेळा वापरला गेला आहे. चित्रात दिसणारा रॉकेट लाँचर PHL-०३ आहे, जो चीनचा मल्टीपल रॉकेट सिस्टम आहे. हा फोटो २०१९ मध्ये चिनी छायाचित्रकार हुआंग है यांनी काढला होता.
