उत्तर प्रदेशातील मेरठमधून पुन्हा एकदा एक घृणास्पद व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रोट्यांवर थुंकताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच लोकांनी संताप व्यक्त केला आणि त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली. पोलिसांनी याची दखल घेत कारवाई करत त्या व्यक्तीला अटक केली.
शोयब असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी मेरठमधीलच रहिवासी आहे. कारमधून जाणाऱ्या एका व्यक्तीने ही संपूर्ण घटना आपल्या कॅमेरामध्ये कैद केली, ज्यामध्ये आरोपी शोयब हा रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खानावळीत काम करत असताना रोट्यांवर थुंकताना दिसत आहे.
पोलिसांनी याची माहिती मिळताच सोमवारी (२६ मे) आरोपी शोयबला अटक करण्यात आली आणि त्याच्याविरुद्ध संसर्गजन्य रोग पसरवणे, जातीय सलोखा बिघडवणे आणि शत्रुत्व वाढवणे या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. अशा कृत्यांमुळे केवळ सामाजिक सौहार्द बिघडत नाही तर सार्वजनिक आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण होतो यावर पोलिसांनी भर दिला. जिल्हा पोलिस अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यास वचनबद्ध असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा :
१२ वर्षांपासून दिल्लीत राहणाऱ्या चार घुसखोर बांगलादेशींना अटक!
बांगलादेशचा पूर्व पाकिस्तान होणार नाही ना ?
तांबेच बोलले राहुल गांधींबद्दलचं ‘सत्य’…
दरम्यान, मेरठ मधून अशा घटना वारंवार समोर येताना दिसत आहेत. मागील दोन महिन्यापूर्वी लग्न समारंभात रोट्यांवर थुंकण्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी मुंडली पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय इम्रानला पोलिसांनी अटक केली होती.
२१ फेब्रुवारी रोजी, थाना ब्रह्मपुरी भागातील प्रेम मंडपात एका हिंदू लग्न समारंभात, इम्रान तंदूरवर रोटी बनवत होता आणि या दरम्यान, तो तंदूरमध्ये ठेवण्यापूर्वी त्यावर थुंकत होता. लग्नाला आलेल्या एका व्यक्तीने इम्रानचे हे कृत्य मोबाईलमध्ये कैद केले आणि ते व्हायरल केले. यानंतर त्याच्यावर कारवाई करत त्याला अटक केली.
