30.1 C
Mumbai
Thursday, June 18, 2026
घरदेश दुनिया“हिजबुल्लाहशी लढाई सीरियाने हाताळावी”

“हिजबुल्लाहशी लढाई सीरियाने हाताळावी”

इस्रायलच्या लेबनॉन मोहिमेवर अमेरिकेची नाराजी

Google News Follow

Related

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीही अनेकदा लेबनॉनमधील इस्रायलच्या लष्करी मोहिमेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आता आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना, डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, तेथील हिजबुल्लाहशी लढण्यासाठी सीरिया अधिक चांगले काम करेल. फ्रान्समधील जी-७ शिखर परिषदेच्या निमित्ताने कतारच्या अमीरांसोबत (Amir of Qatar) झालेल्या बैठकीदरम्यान, ट्रम्प यांनी असे सुचवले की, इराण-समर्थित दहशतवादी गटाविरुद्ध बेंजामिन नेतान्याहू यांच्या मोहिमेमुळे इराणसोबतच्या शांतता वाटाघाटी जवळपास संकटात आल्या होत्या. “इतरांना ठार मारल्याशिवाय इस्रायल हे काम करू शकत नाही, म्हणून सीरियाने ते काम केले पाहिजे,” असे ट्रम्प म्हणाले.

अमेरिका आणि इराण एका आराखडा शांतता करारावर सहमत झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी इच्छा बोलू दाखवल्याने पुन्हा एकदा इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील राजकीय संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे आहेत. ट्रम्प यांची ही टिपण्णी म्हणजे इस्रायलला लगावलेला एक टोला होता. इराण आणि पाकिस्तानने असा दावा केला आहे की, या करारामध्ये लेबनॉनमधील लष्करी कारवाया थांबवण्याचाही समावेश आहे, ज्यामुळे इस्रायलला मोठा धक्का बसला आहे.

ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला की, रविवारी बेरूतवर झालेल्या हल्ल्याबद्दल आपल्याला नापसंती असल्याचे त्यांनी इस्रायलला सांगितले होते आणि पुढे ते म्हणाले की, अमेरिकेशिवाय इस्रायलचे अस्तित्वच नसते. लेबनॉनची राजधानी बेरूतवर झालेल्या इस्रायलच्या ताज्या हल्ल्यात तीन जण ठार आणि सहा जण जखमी झाले. अमेरिकेचा प्रमुख मित्रराष्ट्र असलेल्या इस्रायलविरोधात ट्रम्प यांनी केलेली वक्तव्ये नेहमीपेक्षा अधिक स्पष्ट होती. लेबनॉनच्या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये निर्माण झालेल्या उघड मतभेदांच्या पार्श्वभूमीवर हे घडले आहे.

हे ही वाचा:

१५ दिवसांची मुदत संपली, आता आणखी महिनाभराची मागणी

धार्मिक शब्द पुटपुटत हवाईदल अधिकाऱ्याच्या पत्नीचे धर्मांतरण

एलन मस्क यांचे ‘क्वाड्रिलियनियर’ होण्याचे स्वप्न

अमेरिका-इराण शांतता कराराचा भारताला मोठा फायदा

“इस्रायल खूप काळापासून हिजबुल्लाहशी लढत आहे आणि त्यात अनेक लोक मारले जात आहेत. आणि प्रत्येक वेळी कोणालातरी शोधण्यासाठी तुम्हाला एखादी इमारत पाडण्याची गरज नाही, कारण त्या इमारतींमध्ये बरेच लोक असतात आणि ते सर्व हिजबुल्लाहचे नाहीत, हे मी तुम्हाला सांगू शकतो,” असे ट्रम्प पुढे म्हणाले. मार्च महिन्यापासून इस्रायली हल्ल्यांमध्ये ३,२०० हून अधिक लोक मारले गेल्याचा दावा लेबनीज आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे. इस्रायलने केवळ हिजबुल्लाहच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य केल्याचा दावा केला असला तरी, शेकडो घरे आणि इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.

मात्र, ट्रम्प यांनी नेतान्याहू यांच्यासोबत कोणत्याही कटु संबंधांच्या अटकळी फेटाळून लावल्या. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी अधोरेखित केले की, इस्रायली पंतप्रधानांसोबत त्यांचे उत्तम संबंध आहेत. मात्र, त्याच वेळी ट्रम्प म्हणाले की, “लेबनॉनच्या बाबतीत मला अधिक जबाबदार राहावे लागेल.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
315,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा