पंजाब पोलिसांनी आरएसएस कार्यकर्ता नवीन अरोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी बादल उर्फ बंटी याला बुधवारी उशिरा रात्री जलालाबाद परिसरातील एका स्मशानभूमीजवळ झालेल्या चकमकीत ठार केले. या दरम्यान दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. शस्त्रसाठा जप्त करणे आणि आरोपींच्या इतर साथीदारांना पकडण्यासाठी पोलिसांनी या परिसरात कारवाई सुरू केली होती. पोलिसांनी स्मशानभूमीजवळ पोहोचताच बादल आणि त्याचे दोन साथीदार पोलिसांवर गोळीबार करू लागले.
त्यावर पोलिसांनी आत्मसंरक्षणार्थ प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, ज्यात बादल ठार झाला. या चकमकीत एका हेड कॉन्स्टेबलला गोळी लागल्याने तो जखमी झाला. जखमी पोलिसाला फाजिल्का येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. डीआयजी फिरोजपूर रेंज हरमनबीर सिंह गिल यांनी सांगितले की, १५ नोव्हेंबर २०२५ रोजी फिरोजपूर सिटीमध्ये आरएसएस नेत्याच्या मुलगा नवीन अरोरा याची बाजारात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
हेही वाचा..
इंटरनॅशनल आयडीईएचे नेतृत्व करतील मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार
पंतप्रधान उद्या उडुपीचा दौरा करणार
द. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी परभवानंतर गौतम गंभीरबद्दल बीसीसीआयने काय म्हटले?
६ डिसेंबर रोजी मुर्शिदाबादमध्ये राम मंदिराची पायाभरणी करणार!
हत्येनंतर पोलिसांनी तीन आरोपी—काली, हर्ष आणि कनव—यांना अटक केली होती. कालीला पकडताना सुद्धा चकमक झाली होती. बुधवारी रात्री पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य शूटर बादल फिरोजपूरच्या वस्तीमधून पकडला होता. चौकशीत आरोपींनी सांगितले की, हत्येत वापरलेली शस्त्रे जलालाबादच्या माहमूजोईया स्मशानभूमीत लपवले आहेत आणि त्या ठिकाणीच चकमक झाली. १५ नोव्हेंबर रोजी फिरोजपूर शहरातील मोची बाजार परिसरात युको बँकेजवळ दोन अनोळखी युवकांनी दिवसा ढवळ्या आरएसएसचे वरिष्ठ कार्यकर्ते बलदेव कृष्ण अरोरा यांचा मुलगा नवीन अरोरा याची गोळी मारून हत्या केली होती. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिस छापेमारी करत होते.
हत्या झालेल्या दिवशी चार आरोपी सक्रिय होते. यात कनव, हर्ष, बादल, जतन काली (वस्ती भट्टियांवाली) आणि एक शूटर सहभागी होता. नवीनची हत्या करण्याचा कट १३ नोव्हेंबर रोजी कनवच्या वाढदिवशी त्याच्या घरी बसून रचला गेला होता. या कामासाठी जतन कालीने आपल्या साथीदारांना एक लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. १५ नोव्हेंबरच्या रात्री बादल आणि शूटरने नवीनची हत्या केली. या दोघांना पळून जाण्यास मदत करण्याचे काम कनव आणि हर्ष यांनी केले.







